खाज खरुज चा असेल प्रॉब्लेम तर चुकूनही हे पदार्थ खाऊ नका.! आयुष्यात कोणीही खाज खरुज बरे करू शकणार नाही.!

आरोग्य

शरीराला कधी कधी कमी प्रमाणात खाज येणे हे घाबरण्यासारखे नाही पण ही खास खूप काळापर्यंत येणे ही मात्र चिंतेची गोष्ट आहे. शरीराच्या एका भागावर खाज आली आणि त्या प्रभावित जागेवर आपण खाजवले आणि ती खाज जर बरी झाली तर त्याला आपण त्वचेचा रोग असे म्हणतो त्वचेच्या रोगाचे अठरा प्रकार आहेत.एका विशेष जागी खाज येणे किंवा पूर्ण अंगभर खाज येणे पण हे त्वचेच्या रोगांमुळेच होते त्याच सर्वात मुख्य कारण म्हणजे ड्रायनेस म्हणजे त्वचा कोरडी पडणे.

आपली त्वचा जेव्हा कोरडी पडते तेव्हा मुख्यत्वे आपल्याला खाज येते म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर कधी कधी पावसाळ्यामध्ये देखील बाहेरचे वातावरण थंड असल्यामुळे आपली त्वचा ही कोरडी पडते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर हिट वाढत असेल म्हणजेच गरमी वाढत असेल तरी देखील आपल्या शरीराला खाज येते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण वाढले असेल तर आपल्याला खाज येते.

त्याचबरोबर जर कोणता आजार झाला असेल किंवा किडनीचा त्रास डायबेटीस या आजारांमुळे देखील आपल्याला खाज येऊ शकते.कोणताही पदार्थ खाल्ल्याने देखील त्याची एलर्जी म्हणून आपल्याला खाज येऊ शकते. कोणत्याही एका गोष्टीला हात लागल्यामुळे किंवा आपली त्वचा त्याला लागल्यामुळे देखील एलर्जी खाज आपल्याला येऊ शकते.

जर आपल्या शरीरावर खाज येत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण जर ती खाज आपल्याला कोणत्याही आजाराचा संकेत देत असेल जसे की लिव्हरचा आजार असेल किंवा डायबिटीस आजार असेल किडनीचा काही आजार असेल आणि अशा आजाराचे संकेत जर ही खाज आपल्याला देत असेल आणि आपण या खाजेजवळ दुर्लक्ष करत असू तर मात्र पुढे जाऊन आपल्याला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो किंवा असा काही आजार आपल्याला होऊ शकतो.

थायरॉईड किंवा हार्मोन्सचे बदलाव आपला शरीरामध्ये होत असताना देखील आपल्या शरीराला खाज येऊ शकते.आपल्या शरीराला भरपूर खाज आले की आपल्याला राग यायला लागतो. अनेकदा असे होते की त्यामुळे आपल्याला राग येतो अशावेळी काय करायचे तर डोक्याला थोडं शांत करायचे म्हणजेच जसे की दीर्घ श्वास घ्यायचा. जीवा आयुर्वेद बादाम तेल नाकामध्ये टाकायचे किंवा कोणत्याही तेलाने डोक्यावर मालिश करायची आहे.

हे वाचा:   सकाळी उठून तोंडातली लाळ चेहऱ्यावरच्या डागांना लावल्यास डाग नाहीसे कसे होतात.? काय आहे या मागचे सत्य जाणून घ्या.!

त्यामुळे तुमचे डोके थोडेसे शांत येईल त्याचबरोबर चांगली शांत गाणी ऐकावीत जेणेकरून तुमचे डोके थोडेसे शांत राहील. अशाप्रकारे आपण आपले डोके शांत करू शकतो त्याचबरोबर जेव्हा खाज येते तेव्हा कोणत्या प्रकारचे घरगुती नुसके आपण वापरले पाहिजेत म्हणजेच घरगुती उपाय आपण वापरले पाहिजे ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम खाज हा एक असा आजार आहे जो किंवा या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा जर हा आजार जास्त प्रमाणात झाला असेल तर त्यावर फक्त घरगुती उपाय नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर औषधोपचार करणे देखील गरजेचे आहे.

पण जर खास येत असेल तर त्यावर नारळाचे तेल लावावे म्हणजेच खोबरेल तेल लावावे यामुळे आपली खाज काही क्षणांमध्येच शांत होते. त्याचबरोबर जर जास्त खाज असेल तर आपला कापूर म्हणजे जो आपण मंदिरामध्ये वापरतो तो कापूर घ्यायचा आहे त्याची पावडर बनवून आपल्याला नारळाच्या तेलामध्ये टाकून ते तेल गरम करून नंतर त्याचा वापर आपल्याला जिथे खाज आहे त्या जागेवर करायचा आहे. हा देखील एक जालीम उपाय आहे यामुळे देखील आपली खास कायमची निघून जाते.

सोबतच दररोज सकाळी आपल्याला उपाशीपोटी कडुनिंबाची पाने खायचे आहेत. ही खाल्ल्याने आपली खाज कमी होते कारण ही अँटिबायोटिक मानली जातात. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने खाल्ल्यामुळे आपले र’क्त शुद्ध होते त्यामुळे आपल्याला खाज खाणे बंद होते सोबतच दररोज अंघोळ करणे देखील तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे दररोज अंघोळ केली पाहिजे. पाणी प्यायले पाहिजे जेवढे शक्य होईल तेवढे जास्त पाणी प्यायला पाहिजे.

कलिंगड, काकडी, नारळ पाणी अशा गोष्टी जास्त प्रमाणात पिल्या पाहिजेत कारण त्यामध्ये जास्त पाणी असते आणि ते पाणी आपल्या पोटामध्ये गेल्यामुळे आपल्याला खाज यासारखा प्रकार कधीही होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी आपल्या शरीरामध्ये जाणे गरजेचे आहे त्याचबरोबर एलोवेरा म्हणजे कोरफडचा वापर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये केला पाहिजे जीवा आयुर्वेद मध्ये एलोवेरा चे काही प्रॉडक्ट्स आहेत जसे की फेसवॉश यासारख्या गोष्टी आपल्याला वापरल्या पाहिजे त्यामुळे आपल्याला खाज हा प्रकार कधी होणार नाही.

हे वाचा:   लिंबू मिरचीला अंधश्रद्धा मानणारे लोक एकदा हे नक्की वाचा.! पायाखालची जमीनच सरकली जाईल.! विज्ञान देखील हैराण आहे.!

त्याचबरोबर खाज असेल तर काही तथ्य पाळणे देखील गरजेचे आहेत म्हणजे काय खाल्लं पाहिजे किंवा काय नाही खाल्ले पाहिजे जसे की गरम गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजेत. त्याचबरोबर पित्तवर्धक गोष्टी टाळाव्यात. आता पित्तवर्धक गोष्टी कोणत्या तर चाय,कॉफी, तिखट जसे की आपण चमचमीत गोष्टी खातो जास्त प्रमाणात तिखट खाल्यामुळे आपल्याला पित्त होऊ शकते.

चाय कॉफीचे सेवन देखील आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात केले पाहिजे जर तुम्हाला खाज येत असेल जर तुम्हाला खाज नसेल तरी देखील या गोष्टी आपल्याला प्रमाणातच पाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर आंबट गोष्टी जसे की लोणचे काही आंबट पदार्थ खाणे आंबट पदार्थ टाळावेत. त्यानंतर नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार. मांसाहार जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला खाज, खरुज होऊ शकते.

त्वचा चे आजार आपल्याला जास्त प्रमाणात होऊ शकतात त्यामुळे मांसाहार प्रमाणातच खावे. ही सर्व तथ्य पाळणे गरजेचे आहे. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की लोणचे चे सेवन केल्याने त्वचा विकार होतात परंतु हे चुकीचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.