चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत. वाढत्या वयात हार्मोन्स मध्ये होणारा बदल हे त्यातील मुख्य कारण, याशिवाय चेहऱ्याची कांती कमी होते, त्वचा जास्त तेलकट असणे, तेलकट, मसालेदार, तुपट पदार्थ जास्त खाणे, आपल्यापैकी अनेक जण बाहेरचे पदार्थ जास्त खातात जसे की मैद्याचे पदार्थ जंक फूड यामुळे देखील आपली त्वचा बिघडू शकते व त्वचेवर अनेक समस्या निर्माण होतात अशी इतर करणे ही त्वचा बिघडण्यामागे असू शकतात.
आपल्यापैकी अनेकांची चेहऱ्यावरील त्वचाही तेलकट असते आणि एकदा का तेलकटपणा वाढला की मुरम किंवा आपल्याला त्वचेचे आजार व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आपण खात असणारे खाद्यपदार्थ किंवा दिवसातून जास्त पाणी पिणे यासारख्या गोष्टींकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरम आणि त्वचेवरील डाग या सर्व गोष्टी निघून जातील.
सर्वप्रथम आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला इथे वापरायचे आहेत ती म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी त्वचेला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण इथे आपण ग्रीन टी चा उपयोग चहा पिण्यासाठी करणार नाही तर या ग्रीन टी चा उपयोग फेस पॅक साठी करणार आहोत. ग्रीन टीमध्ये अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे केवळ मुरुम आणि डागांची समस्याच दूर करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते आणि वृद्धत्वाच्या प्रभावांना देखील प्रतिबंधित करते.
त्यामुळे आपल्याला इथे ग्रीन टी चे पाणी काढून त्याचा आईस तयार करून घ्यायचा आहे व आईस तयार झाल्यानंतर त्यांनी आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे. असे केल्यामुळे आपली मुरमे कायमची निघून जातील आणि त्वचा चमकदार बनेल. दुसरा उपाय असा करायचा आहे की, आपल्याला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा गुलाब जल टाकून हे फेसपॅक आपल्याला चेहऱ्यावर लावायचे आहे.
पंधरा मिनिटांसाठी हे फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे आणि पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. मुलतानी माती नियमितपणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. चेहऱ्यावर जास्त फोड, मुरुम झाल्यामुळे होणारी जळजळ रोखण्यास मुलतानी माती खूप फायदेशीर आहे. सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यास मदत करते.
या मातीचा नियमित वापर केल्याने सुरकुत्या आणि त्वचेतील सैलपणा दूर होण्यास मदत मिळते आणि गुलाब पाणी देखील आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्याला पोषण देखील देते. गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते.
अजून एक उपाय आपण आपल्या चेहऱ्यासाठी करू शकतो तो म्हणजे आपल्याला एक केळे घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित रित्या बारीक करायचे आहे त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे व त्यामध्ये आपल्याला चंदन टाकायचे आहे चंदन आपल्या चेहऱ्यावर एक ग्लो आणण्यास मदत करते. चंदनमधील गुणधर्मांमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. चंदनामुळे आपल्या त्वचेवर एक ग्लो होतो.
हे फेसपॅक आपण आपल्या चेहऱ्यावर लावल्यास आपला चेहरा अधिक चमकदार आणि ग्लोविंग होईल. जर आपण हे सर्व उपाय दररोज रीत्या किंवा आठवड्या मधून तीन वेळा केल्यास आपला चेहऱ्यावरील सर्व मुरम निघून जातील. पिंपल क्लियर असा चेहरा आपल्याला मिळेल. त्याचबरोबर आपला चेहरा ग्लोविंग होईल.
यामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी हे घरगुती असल्यामुळे याचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.