मित्रांनो धावपळीच्या जगामध्ये आपल्यापैकी अनेक जण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरून जातात. प्रत्येक जण हल्ली ताणतणाव मानसिक त्रास या सर्वांच्या अडचणीमध्ये आपले आयुष्य व्यतीत करत आहे. अनेक जण सकाळी लवकर कामाला जातात आणि रात्री उशिरा येतात म्हणूनच शरीराकडे फारसे लक्ष दिले जात नाही, तसेच अनेक जण आपल्या आहारांकडे देखील व्यवस्थित लक्ष देत नाही.
दिवसभर कोणतेही पदार्थ खाणे, कधीही जेवणे, अवेळी झोपणे या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. या सर्व विपरीत परिणामामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात. या सर्व आजारांमध्ये अशक्तपणा, थकवा, झोप पूर्ण न होणे, हाडांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, हाय ब्लड प्रेशर, हृदय विकार हे अनेक आजार एकामागे लागू होतात परंतु प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.
तुम्ही घरच्या घरी देखील काही छोटे-मोठे उपाय करून तुमचे शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या घरातील अनेक सदस्य दिवसभर उभे राहून काम करत असतात. अनेक जण एकाच ठिकाणी बसून पायाची घडी करून बसतात यामुळे आपल्या पायांच्या नसा मोकळ्या होत नाहीत, नसा आखडून जातात. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि म्हणूनच पोटऱ्या देखील दुखतात.
अनेकदा आपले पोट वेळेवर स्वच्छ होत नाही. पचन संस्था धुमी गतीने कार्य करते आणि आपल्याला वेगवेगळे आजार होऊ लागतात. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही साहित्य लागणार आहे ते घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होणारे आहे. आज आपण स्वयंपाक घरातील पोळी बनवण्यासाठी जे साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते त्या साहित्याचा उपयोग करणार आहोत. या साहित्याचे नाव लाटणे कोलपाट आहे.
या दोन्ही साहित्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हातापायांचे आजार, नसांचे आजार, हातांच्या वेदना, सायटिका, मायग्रेन, हाडासंबंधीत आजार, कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे दूर करू शकतात आपल्या सर्वांना माहितीच आहे की ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंचर या दोन्ही शास्त्रांमध्ये आपल्या शरीराच्या विविध भागांचा अभ्यास केला जातो. आपल्या शरीरावर असे काही पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सला दाबल्यावर आपल्या शरीरामध्ये फरक जाणवत असतो.
म्हणूनच या पॉईंटच्या मध्यातून आपण आपल्या शरीरातील अनेक वेदना दूर करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या पायाची रचना समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या पायाचा अंगठा हा आपल्या शरीराचे डोके असते आणि इतर जे काही चार बोट आहेत ते हात आणि पाय असतात. पायाच्या तळव्याचा जो मधील भाग असतो तो आपल्या किडनीचा महत्त्वाचा अवयव असतो.
त्यानंतर पायाच्या खाली शेवटी जो काही भाग आहे तो शरीरातील अन्य अवयव आहेत असे मानले जाते आणि म्हणूनच ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंचर या शास्त्रांमध्ये आपल्या शरीराची निगा कशी राखायची हे देखील सांगण्यात आलेले आहे. या शास्त्राच्या मदतीने आपण सहजच आपल्या शरीरातील अनेक गंभीर वेदना दूर करू शकतो आणि भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांपासून आपली मुक्तता देखील करू शकतो.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आपले पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टॉवेलच्या मदतीने पाय व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला लाटणे लागणार आहे. हे लाटणे आपल्याला पायाच्या खालच्या बाजूने वरच्या बाजूने प्रेस करायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण चपात्या लाटतो त्याच पद्धतीने लाटणे आपल्या पायावर फिरवायचे आहे.
असे केल्याने तुमच्या कानाच्या मागे एक ऊर्जा निर्माण होईल आणि तुमच्या सगळ्यांमध्ये जे काही वेदना आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागतील त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर डोकेदुखी होत असेल तर अशावेळी पायाचा अंगठा असतो त्या अंगावर लाटण्याने प्रेस करायचे आहे आणि त्या अंगठा वर लाटणे फिरवायचे आहे, असे केल्याने देखील डोकेदुखी बंद होऊन जाईल.
जर तुम्हाला किडनीचे विकार असतील, किडनीच्या ठिकाणी वेदना जाणवत असतील तर अशावेळी पायाच्या तळव्याच्या मध्यभागी लाटणे फिरवायचे आहे यामुळे देखील शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल. शरीरातील र’क्त प्रवाह सुरळीत होऊन लागेल आणि किडनी योग्य पद्धतीने कार्य करून लागेल. बहुतेक वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने पाठीचा मणका दुखू लागतो, अशावेळी देखील पाठीवर तुम्ही मणके व्यवस्थित करण्यासाठी लाटणे फिरवू शकता.
अशाप्रकारे विविध पद्धतीने तुम्ही लाटण्याच्या मदतीने शरीरातील वेदना मुळापासून नष्ट करू शकता. जर तुमच्याकडे लाटणे नसेल तर तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असणारे ॲक्युप्रेशरच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य देखील आणू शकतात आणि या साहित्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील वेदना लवकरच दूर करू शकता, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची महागडी ट्रीटमेंट न करता घरच्या घरी देखील तुम्ही वेदना दूर करू शकता.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.