सतत तोंड येणे, तोंडाचे किंवा ओठाचे कातडे निघणे.! असे का होते माहिती आहे का.? दोन तीन गोष्टी करणे बंद करा आयुष्यात कधीही तोंड येणार नाही.!

आरोग्य

माउथअल्सर हा एक वेदनादायक आजार आहे, जे तुमच्या तोंडात किंवा तुमच्या हिरड्यांच्या तळाशी विकसित होतात. यामुळे तुम्हाला खाणे, पिणे आणि बोलण्यातही त्रास होतो. जेव्हा तुम्ही कमी पाणी पितात किंवा जास्त तिखट-मसालेदार पदार्थ खातात, तेव्हा त्यांची वाढ होण्याची शक्यता जास्त असते. अनेक कारणांमुळे हे माऊथअल्सर चे आजार आपल्याला होत असतात जसे की शरिरात लोह आणि व्हिटॅमिन बी यांचं संतुलन नसणे.

अति प्रमाणात अतिप्रमाणात तिखट, तेलकट व मसाल्याच्या पदार्थांचे सेवन करणे.अपचन होण्याची वारंवारं तक्रार असल्यास तोंड येते. दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, दात स्वच्छ न ठेवणे. औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्‍ट होऊन ही तोंड येते. आपल्या शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलाने देखील माउथ अल्सर सारखे आजार होत असतात. शरीरातली गरमी वाढल्याने सुद्धा हा आजार आपल्याला उद्भवत असतो.

अशा अनेक गोष्टींमुळे माउथ अल्सर सारख्या समस्या आपल्याला उद्भवत असतात. माउथ अल्सर मुळे बोलतानाही खूप त्रास होतो. ही समस्या अनेकांना वारंवार त्रास देत असते. त्यामुळे अनेकांना या माउथ अल्सरचा खूप त्रास होतो. माउथ अल्सर मुळे जेवताना देखील विचार करून जेवायला लागते. काही लोकांना हा त्रास सतत उद्भवत असतो. कधी कधी वेगवेगळया टूथपेस्ट च्या वापरणे देखील ह्या समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा:   ज्या लोकांना असतात या चार सवयी, त्या लोकांना आयुष्यात कधीच होत नसतो पचना संबंधीचा त्रास.!

माउथ अल्सर या त्रासाला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर आता आपण पाहूया हा त्रास कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय. माऊथ अल्सर हा त्रास कमी होण्यासाठी सर्वात पहिला मिठाच्या पाण्याने तीन चार वेळा गुळण्या करावे. त्यामुळे हा त्रास कमी होउन जातो. दुसरा उपाय असा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये बेकिंग सोडा हा सहज उपलब्ध असतो.

तर एका वाटीमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे आणि ती पेस्ट तोंडामध्ये जिथे फोड्या आल्या आहेत तिथे किंवा तोंडाच्या साली निघाल्या आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे. हा उपाय केल्याने तोंडचे साली निघणे कमी होऊन जाते आणि झोंबत असलेली त्वचा बरी होऊन जाते. तिसरा उपाय म्हणेच हायड्रोजन पेरॉक्साइड हे पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने गुळण्या करणे.

हे वाचा:   फक्त तीन वस्तू दाखवून देतील कमाल, चेहरा इतका गोरा होईल की सर्वजण बघतच राहतील.!

हा उपाय केल्याने देखील माऊथ अल्सर सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी मध लावा. त्यामुळे लवकरच आराम मिळेल. नारळ तेलात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे अल्सरच्या जंतूंचा नाश करण्याचे काम करतात.आपण कापसाच्या मदतीने तोंडात अल्सर आलेल्या ठिकाणी लवंग तेल लावू शकता. लवंग देखील माऊथ अल्सर सारख्या समस्ये वर खूप गुणकारी असते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.