पाच वर्षापासून संपूर्ण अंगाला होता गजकर्ण.! एक काम केले आणि झटकन गायब झाला.! खाज, खरूज, नायटा जबरदस्त उपाय.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे असे अनेक आजार कधी ना कधी होत असतात. प्रत्येक आजारांची विशेष अशी मुख्य कारणे असतात. हल्ली पावसाचे दिवस असल्याने आपल्या पैकी अनेक जण पाण्यात भिजतात. दीर्घ काळ पाण्यात राहिल्याने किंवा ओले कपडे परिधान केल्याने आपल्या अंगाल खाज सुटू लागते. या सगळ्या गोष्टी मुळे अंगाला खाज सुटू लागते.

खाज येण्यामागे बहुतेक वेळा अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी करणे असू शकतात. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात. पण मुख्यतः कधी कधी याची कारणे वेगळी देखील असू शकतात जसे की पावसाळ्यामध्ये खाज येणे हे एक साधारण गोष्ट आहे.

कारण पावसाळ्यामध्ये आपण चिखल किंवा फासलेल्या पाण्यातून चालतो त्यामुळे आपण पाय स्वच्छ धुतले नाही त्यांची निगा राखली नाही तर आपल्या पायांना खाज येते आणि त्याचे रूपांतर इन्फेक्शन मध्ये होते त्यामुळे खाजेचे असे अनेक आजार आपल्याला होत असतात त्यासाठी आपण डॉक्टर जवळ जातो डॉक्टर क्रीम देतात पण कधी कधी या क्रीम मुळे हा आजार बरा होण्यास पुष्कळ वेळ निघून जातो.

त्यामुळे आपली खाज अजून जास्त वाढते म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर आपण खरूज व दाद वर केल्यामुळे खरूज जिथे झाला आहे त्या ठिकाणी आपल्याला थंडावा मिळेल व खरूज व दाद लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल, चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे.

हे वाचा:   पित्त कायमचे गायब.! मरेपर्यंत पित्ताची एकही गोळी घेणार नाही.! आजपासून पित्तासाठी करा हा एक रामबाण उपाय.!

सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचे आहे ते म्हणजे केळे. केळे हे खूप थंड असते आणि त्वचेवर ते लावल्यानंतर आपली खाज हळूहळू कमी होण्यास मदत होते म्हणजेच केळ्याचा थंडावा या खाज व खरुज ला थंड करण्यास मदत करतो ज्यामुळे ही खाज जास्तीत जास्त वाढत नाही ती तिथेच थांबते म्हणून आपल्याला इथे केळ्याचा वापर करायचा आहे.

म्हणून अर्धे केळे घेऊन आपल्याला चमचाच्या किंवा हाताच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे म्हणजेच केळ्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पिकलेल्या केळ्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे ही एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये वापरायचे आहे तो म्हणजे कापूर. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते.

जुना संधीवाताच्या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल खूप फायदेशीर आहे. कापूरचा वापर अनेक औषधांमध्ये वापर करण्यात येतो. त्यामुळे इथे आपल्याला तीन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याची बारीक पूड तयार करायची आहे आणि आपण बारीक पेस्ट केलेल्या केळ्यामध्ये ही पूड टाकायची आहे जेणेकरून आपल्या जखमेवर थंडावा मिळेल व आपली जखम लवकरात लवकर बरी होईल.

तिसरी गोष्ट इथे आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे लिंबू. लिंबू देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयोगी असते. लिंबा मध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटिफंगल प्रॉपर्टी असते त्यामुळे आपला खरूज, खाज पूर्णपणे बरी होण्यास मदत होईल म्हणूनच आपल्याला यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे जेणेकरून या तिन्ही गोष्टी एकत्र करून खरूज व खाज वर लावल्यास त्याला आराम मिळेल व लवकरात लवकर खरूज बरा होण्यास मदत होईल.

हे वाचा:   या पदार्थांचे सेवन करणे म्हणजे हाडे आतमधून पोकळ करून घेणे, हाडांचे हे पदार्थ आहे दुष्मन.!

हा उपाय प्रभावित जागेवर लावल्यास तिथे परत कधीच खरूज किंवा दाद येणार नाही किंवा तिथे कोणती जखम झाली होती हे देखील आपल्याला कळणार नाही तिथला डाग देखील निघून जाईल. या उपायाचा वापर रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुतल्यानंतर त्यावर करायचा आहे व कमीत कमी अर्धा किंवा एक तास हे मिश्रण लावून तसेच ठेवायचे आहे.

दिवसातून दोन ते तीन वेळा या उपायाचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून एका आठवड्यामध्ये दाद, खाज आणि खरूज बरा होईल. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे आहे जसे की स्वच्छता बाळगणे, स्वच्छ धुणे,जर बाहेरून आलो असून तर हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत. पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर जर आपल्याला दाद किंवा खरूज झाला असेल आपल्या सर्व गोष्टी वेगळ्या ठेवायच्या आहेत जसे की आपले टॉवेल आपला साबण या गोष्टी आपल्याला सर्वांपासून इतरांपासून वेगळ्या ठेवायच्या आहेत जेणेकरून हा संसर्ग अजून कोणालाही होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.