रात्रीचे पाण्यात टाकून झोपा, सकाळी करा सेवन कंबर दुखी विसरून जावे लागेल.! आयुष्यात असा उपाय बघितला नसेल.!

आरोग्य

अनेकदा एक ठराविक वय झाले की त्यानंतर आपल्याला अशक्तपणा येऊ लागतो. कंबर दुखी होते. डायबिटीस चा त्रास होतो. शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते, अशावेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन अनेक औषधांचे सेवन करतो आणि एका ठराविक वयामध्ये एवढी औषधे घेणेदेखील आपल्या शरीरासाठी चांगले नसते म्हणूनच आजचा आपण जो घरगुती उपाय जाणून घेणार आहोत तो या अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे व हा घरगुती उपाय बनवण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. सर्वप्रथम हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. या तिळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये देखील काळया तिळांचा वापर केला जातो. या तीळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम आणि ओमेगा-3चे पोषक घटक असतात.

तीळ खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर आहेत म्हणूनच आपल्याला देखील इथे काळा तिळाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपण आपली गुडघेदुखी, कंबर दुखी व डायबिटीस सारख्या आजारांपासून कायमचे बरे होऊ शकू. दुसरी गोष्ट आपला येथे वापरायची आहे ती म्हणजे बडीशेप.

बडीशेप देखील औषधी गुणधर्मांचे भंडार मानले जाते. शरीरातील र’क्त शुद्ध करण्याचे काम देखील बडीशेप करते. त्वचेसाठी दररोज बडीशेप खाणे फायदेशीर ठरते. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कायम जवळ बडीशेप ठेवावी. बडीशेप तोंडाची दुर्गंधी घालवण्यात मदत करते. स्वादिष्ट चवीशिवाय बडीशेप खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तज्ञांच्या मते, बडीशेप हे असेच एक सुपरफूड आहे जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते.

हे वाचा:   सावधान.! अंड्याचे कालवण करताना हा पदार्थ त्यात चुकूनही टाकू नका.! शरीर भयंकर विकारांनी ग्रासले जाईल.! थेट गाठावा लागेल दवाखाना.!

आपल्याला येथे बडीशेपचा वापर करायचा आहे. आता आपल्याला अर्धा चमचा काळे तीळ व एक चमचा बडीशेप टाकून एक ग्लास पाण्यामध्ये या दोन्ही गोष्टी एक ते दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे पाणी गरम करून याचा काढा तयार करून घ्यायचा आहे. कमीत कमी तीन ते चार मिनिटे हे मिश्रणाला असेच गरम होऊ द्यायचे आहे. एकदा या दोन्ही गोष्टी गरम झाल्या की याचा काढा आपल्याला गाळून प्यायचा आहे.

जर गरज वाटत असेल तर यामध्ये थोडेसे मध देखील टाकू शकता पण ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मधाचा वापर करू नये. तसा हा काढा चवीला कडू असेल त्यामुळे मधाचा वापर तुम्हाला जर हवा असेल तरच करावा.. जर वाटत नसेल तर करू नये त्यामुळे यामधील नेमके औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर जर ज्या लोकांना मधुमेह असेल त्यांनी मधाचा वापर न करता या काढ्याचे सेवन केले तर शरीरामधील साखर देखील कमी होण्याची शक्यता असते.

भरपूर प्रमाणात शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते त्यामुळे जर मधुमेह असेल तर याचे सेवन आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर या काढ्याचे सेवन लगातार एक महिना आपल्याला करायचे आहे, म्हणजेच दररोज सकाळी उठल्या नंतर उपाशी पोटी या काढाचे सेवन महिनाभर केल्याने आपल्या शरीरामधील होणाऱ्या हाडांचे दुखणे, डायबेटीस शिवाय कंबर दुखी, गुडघेदुखी हे आजार देखील कमी होतील.

हे वाचा:   सात दिवसाच्या आत मुळव्याधीचे काम तमाम होऊन जाईल.! मूळव्याधीला मुळापासून उखडून टाकेल हा सोपा उपाय.! प्रत्येकाने एकदा नक्की वाचा.!

त्याचबरोबर जर आपल्याला तूपट, तेलकट खाल्याने ऍसिडिटी होत असेल तर दररोज या काढ्याचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी देखील होणार नाही. पित्त होण्याचे प्रमाण कमी होईल. जर आतड्यांना सूज येत असेल तर ती सूज देखील कमी होईल. फक्त शरीरातील सूज नाही तर शरीराच्या बाहेरील सूज देखील कमी होण्यासाठी या काढ्यामुळे फायदा होईल. त्याचबरोबर आपल्या शरीरातील कॅल्शियम देखील वाढेल.

सर्वात मोठा आजार सांधेदुखीचा असतो. गुडघेदुखी, सांधेदुखी आणि हे आजार मुख्यतः कॅल्शियमच्या कमी असल्याने होत असतात. हा काढा प्यायल्याने आपल्या शरीरामधील कॅल्शियमची पातळी वाढेल आणि त्यामुळे हे आजार परत कधीच होणार नाहीत असा हा फायदेशीर असलेला उपाय आपल्याला दररोज एक महिना करायचा आहे. जर हाडांचे दुखणे खूप जास्त असेल तर एक महिन्यानंतर देखील तुम्ही हा उपाय चालू ठेवू शकता याने आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही उलट फायदाच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.