सगळ्या चुका करा पण ह्या वस्तू खरेदी करण्याची चूक करू नका.! तुम्हाला माहिती आहे का तुम्ही संकटाना देत आहात रोज आमंत्रण.! पण कसे.?

आरोग्य

आता सगळीकडेच परिवर्तन होवून जग बदलू लागले आहे. सर्व अवजड कामे आता काही यंत्रांच्या मदतीने केली जावू लागली आहेत. माणूस आता एवढा अॅडव्हांस झाला आहे की त्याला आता बाजारातून काही आणायचे असले तरी ही आता घराची पायरी न उतरता सगळे घरच्या घरीच घरपोच होते. मात्र प्रगाती सोबतच काही गोष्टींचा दुष्परिणाम देखील दिसून येवू लागले आहेत. होय आपण आपल्या सोयी साठी वापरल्या जाणार्या काही गोष्टी आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात.

आज आपण अश्या पाच गोष्टीं बद्दल बोलणार आहोत ज्या आपण रोज वापरत आहोत मात्र याचे दुष्परिणाम कदाचीत तुम्हाला माहित नसतील. हे अपाय ऐकल्यावर तुम्ही चकित होवून झाल. आजची माहिती तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणून हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. आम्ही जे पाच घटक सांगणार आहोत त्यातील पहिला घटक म्हणजे फाॅइल पेपर.

आज काल अनेक लोक जेवण गरमा-गरम ठेवण्यासाठी फाॅइल पेपरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. जास्त खर्च न करता जेवण ताजे तवाने ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणून हा पेपर आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. मात्र हा फाॅइल पेपर अॅल्युमिनियमच्या बारीक शीट पासून तयार केला जातो. अन्न पदार्थ गरम असतानाच यात भरले जातात या मुळे अॅल्युमिनियम वितळून ते अन्न पदार्थांमध्ये समाविष्ट होते व हे अॅल्युमिनियम आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे.

हे वाचा:   देवघरात ठेवलेला पितळाचा दिवा दोन मिनिटात चमकू लागेल.! दोन रुपयांत होईल नवा पितळाचा दिवा.!

याच्या रोज सेवनाने थायराॅइडची समस्या उद्भवू शकते. म्हणून फाॅइल पेपर वापरणे टाळा आणि त्या ऐवजी मल-मलचे कापड वापरा. आपण आपले घर साफ रहावे म्हणून अनेक प्रकारची काळजी घेत असतो. घरातील लादी साफ करण्यासाठी आपण फ्लोर क्लीनर वापरतो. फ्लोर क्लीनरने तुमची लादी चमकते व दुर्गंध जावून एक चांगला सुगंध देखील दरमळू लागतो. हे फ्लोर क्लीनर अनेक केमिकल रसायने टाकून बनवले जातात.

यात कोणत्या ही प्रकारचा नैसर्गिक धातू आपणास पहायला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही याच्या मदतीने लादी पुसता आपल्या घरातील वातावरणात तसेच हवेत हे रसायन मिक्स होते व हवा दूषीत करते. अशी हवा आपण 24 तास ग्रहण करत असतो. याचा दुष्परिणाम म्हणजेच आपल्याला श्वसनाचे अनेक आजार होण्यास सुरवात होते. म्हणून हे बाजारू फ्लोर क्लीनर टाळा. तीसरा घटक आहे आपण रोज वापरतो ती टाल्क पावडर.

चेहरा तजेदार दिसावा, चेहर्याचा काळपटपणा दूर व्हावा म्हणून आपण टाल्क पावडर वापरतो. ही टाल्क पावडर टाल्क नामक एका दगड पासून निर्माण केली जाते. मात्र मित्रांनो यात अनेक असे बारीक केमिकल टाकले जातात जे आपल्या नाकाद्वारे थेट फुफ्फूसा पर्यंत पोहचतात. या टाल्क पावडरच्या रोज वापराने तुम्हाला फुफ्फूसांचे आजार होवू शकतात. श्वास घेण्यास अडथळे तसेच अस्थमा यां सारख्या समास्या टाल्कच्या रोजच्या वापराने होवू शकतात.

हे वाचा:   सततच्या पोट दुखीला कंटाळला आहात तर एवढे एक काम करा.! या उपायाने कोणतीही पोट दुखी लगेच थांबते.! महिलांनी नक्की वाचा.!

म्हणूनच टाल्क पावडरचा अती वापर टाळा. भांडी घासण्यासाठी आता बाजारात अनेक घटक मिळू लागले आहेत. यांच्या वापराने भांडी अगदी चांगली स्वच्छ होतात व चमकू लागतात. मात्र या बाजारात मिळणार्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात सल्फेट असते. हे सल्फेट रोज आपल्या शरीरात जाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे याने भांडी घासून तुम्ही तुमच्या शरीरात रोज याला आमंत्रित करत आहात.

सुल्फेटच्या प्रभावाने तुम्हाला पोटाचे विकार होवू शकतात. शेवटचा घटक म्हणजे एयर फ्रेशनर. आपल्या घरातील वातावरण प्रसन्न रहावे म्हणून आपण आपल्या घरी एयर फ्रेशनर मारतो. याने आपले घर सुगंधीत होते. मात्र हे बनवताना यात कोणता ही नैसर्गिक घटक वापरला जात नाही. हे फक्त आणि फक्त रासायनिक पदार्थांनी बनवले जाते. याचा दुष्परिणाम म्हणजेच आपणास श्वसनाच्या समस्या होवू लागतात.

दमा व अस्थमा यांसारख्या विकरांना आपण आपल्या समीप बोलवतो. म्हणून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी वरील गोष्टींचा वापर टाळा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.