केस दुप्पट करण्यासाठी करावी ही सोपी टेक्निक.! अनेक लोकांचे या सोप्या पद्धतीने गळालेले केस पुन्हा आले आहेत.!

आरोग्य

केस हा आपल्या त्वचेचा एक अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. माणसाला तथा पशूंना प्रकृति ने थंड आणि गरम तापमान असलेल्या क्षेत्रांमद्धे राहणारे जीवांना केस दिले आहे. जे थंडीत थंडीपासून रक्षा करतातच आणि गर्मीत जास्त उष्णतेपासून डोक्याची रक्षा करतात. जेव्हा शरीरात असहनशील गर्मी पडते, तेव्हा शरीरातून घाम वाहून बाहेर पडतो.

मात्र आज काल डोक्यावरचे केस हे सुशोभिकरणाची वस्तू समजले जातात. डोक्यावर केस असणे म्हणजे सौंदर्याची निशाणी समजली जाते. आपल्या आसपास काही लोकांच्या डोक्यावर खूप कमी अथवा पातळ केस असतात. काहींचे केस तर संपूर्ण झडून गळून गेलेले असतात. हे लोक अनेक औषधे खातात वेगवेगळ्या प्रकारची तेल आणि शैम्पू वापरतात. मात्र या समस्येचे समाधान काही त्यांना मिळत नाही.

या विपरीत बाजारातील कृत्रिम औषधे वापरुन शरीरावर तसेच केसांवर याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही देखील अश्या समस्येने ग्रस्त असाल तर मुळीच चिंता करु नका. कारण हा उपाय आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलो आहोत. आज या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमचे केस वाढू लागतील, त्यांची चमक परत येईल व ज्यांचे केस गेले आहेत झडले आहेत त्यांचे देखील नवीन केस येण्यास सुरवात होईल.

हे वाचा:   आता आयुष्यात कधीच तुमच्या घरात मुंगी, किडा मच्छर प्रवेश सुध्दा करू शकणार नाही.! हा उपाय जो करतो तो मुंग्यांच्या, माच्छाराच्या त्रासापासून कायमचा वाचतो.!

केस काळे भोर व लांब सडक होतील. हा एक घरगुती व साधा सरळ उपाय आहे. चला तर पाहूया हा उपाय. सर्व प्रथम जाणून घेवूया केस गळतीची आणि केस पातळ होण्याची कारणे. मित्रांनो वाढते प्रदूषण हे केस गळतीचे प्रमुख कारण आहे. आज काल सर्व पदार्थांमध्ये भेसळ केलेली दिसून येते ते पदार्थ खाण्याचे असो अथवा पिण्याचे हेच काय तर आपण श्वास घेणारी हवा देखील दुषीतच आहे.

दुसरे कारण म्हणजे चुकीचे खाण-पान होय बाहेरचे अतिशय तिखट अथवा तेलकट किंवा मसालेदार जास्त खाल्यास देखील तुमचे केस पातळ व विरळ होवू शकतात. केसात कोंडा होणे, केस चावणे, डोक्याच्या त्वचेला खाज उठणे ही केस गळतीची सामान्य लक्षणे आहेत. फोडणीत जिरं आणि मोहरीसोबत कढीपत्ता टाकला की, असा मस्त खमंग वास सुटतो.

डाळ, आमटी, कढी यामध्ये कढीपत्ता आवर्जून घातला जातो. केसांसाठी कढीपत्ता बहुगुणी आहे हे अभ्यासातून सिद्ध झालेले आहेच. अनेकांना केसांच्या तक्रारी असतात. त्यात प्रामुख्याने केसगळती, कोंडा आणि पांढरे केस, कोरडे केस ही केसांची समस्या अगदी सर्वसाधारण आहे. या सगळ्यावर कढीपत्ता अत्यंत गुणकारी आहे. कढीपत्ता चे केसांसाठी उपयोग खूप आहे.

म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपण दहा ते बारा कढी पत्याच्या पानांचा वापर करायचा आहे. दुसरा घटक म्हणजे केली. केळे खाल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते. तसेच मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   कोलगेटच्या उपायाने नाकावरची सगळी घाण स्वच्छ होईल.! नाकावर असलेले ब्लॅक हेडस कायमचे घालावा.! त्वचा बनवा एकदम मऊ.!

सोबतच आपल्या केसांना देखील योग्य केराटीन देण्याचे काम केळे करते. यानंतरच शेवटचा घटक म्हणजे ओल्या खोबर्याचे तुकडे. खोबरे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणूनच खोबरेल तेलाचा वापर आपण कित्येक वर्ष्ये केसांसाठी करत आलो आहोत. म्हणूनच दहा ते पंधरा फोडी ओल्या खोबर्याच्या देखील घ्या. कढी पत्याची पाने, केळ्यांचे सात ते आठ तुकडे व खोबर्याचे दहा ते पंधरा तुकडे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

याची चांगली पेस्ट तयार झाली की रोज रात्री झोपताना ही आपल्या डोक्याला लावून झोपा सकाळी उठून शैम्पू प्रमाणे धुवून टाका. असे काही दिवस रोज केल्याने तुमच्या केसांना वाढ मिळेल. खराब व पातळ झालेले केस परत एकदा काळेभोर व दाट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.