अभ्यासाद्वारे झाले आहे सिद्ध.! या चार गोष्टी पाण्यात भिजवून खाल्ल्याने म्हातारपण खूप उशिरा येते.! कधीच दवाखान्याची पायरी चढायची नसेल तर एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आजकाल अभ्यासाद्वारे हे सिध्द झाले आहे की काही गोष्टी ह्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मित्रांनो आजची माहिती अत्यंत खास आणि जबरदस्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टींचे वापर करणायची पद्धत सांगणार आहोत, खाण्याची पद्धत सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं म्हातारपण रोखलं जाईल. तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही.

यासोबत जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल, सांधे दुखी, गुडघे दुखी, खांदे दुखी, कंबर दुखी, मान दुखी असेल तर त्यातून मुक्ती मिळेल. याशिवाय पुरुषांचे रोग असतील तर त्यातून सुटका होईल. हा प्रयोग केल्याने तुमच्या शरीरात अपार शक्ती येईल. जुन्या काळातील भारतीय लोकं मातीची भांडी वापरत असे. याचे असंख्य फायदे असतात. असं म्हंटल जात यातून आपल्या शरीराला गरज असणाऱ्या अनेक प्रकारचे विटामिन्स,मिनरल्स मिळतात.

तुम्ही जवळच्या कुंभाराकडून मातीचे एक भांडे आणा. मातीच्या भांड्यामध्ये आम्ही सांगितलेल्या वस्तू सांगितल्याप्रमाणेच भिजवून खात असाल तर तुमच्या शरीरावर चमत्कारिक असा फरक दिसून येईल. पहिला पदार्थ आहे बेदाणे /किसमिस. किसमिस खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही हे सर्वजण जाणतात. ऍसिडिटी बद्धकोष्ठताची समस्या होत नाही. यात लोह, मॅग्नेशियम, फॉसफरस, कॅल्शियम असते.

हे वाचा:   या गोष्टी घडू लागल्या तर समजून जा हार्ट अटॅक येणार आहे.! वेळीच सावध होण्यासाठी खूप महत्वाची माहिती.!

पित्त प्रकृती असणाऱ्या साठी देखील बेदाणे उत्तम होय. परंतु फायदा होतोय म्हणून प्रमाणाचे भान असू द्यावे. दुसरा घटक आहे बदाम. बदामाच्या सेवनाचे फायदे कोणाला माहित नाही आहेत? व्हिटॅमिन इ चा प्रचंड स्रोत असलेल्या बदामाने मेंदू तल्लख होतो. हाडांना बळकटी येते. हृदया साठी बदाम चांगले असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात.

हे थोडे महाग असते खरं. ज्यांना परवडत नाही त्यांनी शेंगदाण्याचा प्रयोग करावा. तिसरा घटक आहे खारीक. खारीक म्हणजे सगळ्यात जास्त ताकद देणारा पौष्टिक घटक होय. यात कॅल्शियम, लोह खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे शरीरात कधीही रक्ताची कमतरता होत नाही. थंडीच्या दिवसात खारकेचे सेवन म्हणजे वरदानच होय. सर्दी खोकला यात खूप फायदा होतो खारकेचा. चौथा घटक म्हणजे अक्रोड.

हे वाचा:   हातापायाला येणाऱ्या मुंग्या, गुडघ्याचा दुखणे, पोटरी सगळ थांबणार.! पुन्हा कधीच कोणतही औषध किंवा गोळी घ्यावी लागली तर बोला.!

अक्रोड हृदय, मेंदू एकूणच आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतो. याचा प्रयोग नियमित केल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता कधीच जाणार नाही. याच्या सेवनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची त्वचा चमकु लागेल. मातीच्या भांड्यात पाणी घाला. यामध्ये 2-3 अक्रोड, 15-20 बेदाणे, 4-5 बदाम, 3 खारीक हे सर्व रात्र भर भिजत ठेवा.

दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व खाऊन ते पाणी प्या. हे सलग केल्याने आपल्या शरीरात होणारे चमत्कारिक बदल तुम्ही स्वतःच अनुभवाल..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.