पायाला पडलेल्या भेगा, दोन दिवसात मऊ करायचे असतील तर यासारखा उपाय सापडणार नाही.! असा उपाय हिवाळ्यात केल्यास संपूर्ण हिवाळा आरामात जाईल.!

आरोग्य

आपण माणसे खूप हौशी आहोत. आपल्या पैकी प्रत्येकाला सुंदर दिसण्याचे आकर्षण असते. सौंदर्य म्हटलं की चेहरा आणि केसाकडेच लक्ष दिलं जातं. परंतू पायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आपल्याला हमखास जाणवते. मित्रांनो पायांच्या भेगा बऱ्याच महिलांना येणारी समस्या आहे व आता ही समस्या आता प्रत्येक घरोघरी एक सामान्य समस्या बनत चालली आहे.

आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच चेहऱ्याएवढंच महत्त्व पायाला दिलेलं आहे. स्वच्छ व सुंदर पाय हे सौंदर्याचं एक लक्षण आहे. पण पायांना भेगा म्हणजेच क्रॅक हिल्स हे बऱ्याच लोकांना होणारी समस्या आहे. त्यामुळे त्या सुंदर, छान दिसणाऱ्या चप्पल, सँडल्स घालू शकत नाहीत किंवा घालण्याचं टाळतात. भेगा ह्या शरीरावर कोठेही पडू शकतात, पण पायाची टाच व पायांच्या बोटांमधली जागा येथे प्रामुख्यानं दिसून येतात.

दररोज आपण साधारणतः १८०० पावले चालयाला हवे व पायांच्या तळव्यामध्ये अनेक मांस पेशी असतात . सोबतच यात २६ हाडे व २९ जॉइंटस आहेत. ‘रिफ्लेक्सोलॉजी’ म्हणजेच पायात बिंदू पॉइंट्स असतात व ते शरीरातील अवयव, ग्रंथी यांच्याशी निगडीत असतात. त्यामुळे आपलं आरोग्यही पायाशी निगडीत आहे. बऱ्याचदा रोगाचं निदान करण्यासाठी तसेच चिकित्सा करतानाही या बिंदूंना विशेष महत्त्व आहे.

हे वाचा:   बघा साबुदाणा कसा बनतो.! उपवासाला साबुदाना खात असाल तर नक्की वाचा.!

पाच हजार वर्षांपूर्वीसुद्धा पायांना भेगा पडण्याच्या समस्येचा उल्लेख आयुर्वेदात आहे, त्यावरील उपचारही सांगितले आहेत. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला याचा पायाच्या भेगांची समस्या दूर करण्याचा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही घरच्या घरीच हा उपचार करु शकता चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

समस्या हा खरंतर कमीत कमी त्रासदायक आजार आहे. परंतू या भेगा खोलवर जातात, तेव्हा डॉक्टरांकडून उपचारही घ्यावे लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच लक्ष दिले, तर पुढील नुकसान-उपचार टाळता येणं शक्य आहे. विशेषतः ज्यांना डायबेटिस झाला आहे, त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे या भेगा खोलवर गेल्यास संसर्ग होऊन पाय सडण्याची क्रिया सुरू होऊ शकते.

त्यामु‍ळेच डायबेटिसच्या रुग्णांनी पायाला खूप महत्त्व दिलं पाहिजे व त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. दिवसभर उभे राहणे, टाचा उघड्या असणाऱ्या चपला किंवा बूट कायम वापरणे , चालण्याची चुकीची पद्धत, अति उष्ण तापमान, सतत थंड पाण्याशी संपर्क, खनिजांची कमतरता, घर्म ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे न होणे व कमी घाम येणं, थायरॉइड ग्रंथींची कार्यक्षमता कमी होणं.

हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम पाय स्वच्छ करून ग्लिसरीन आणि गुलाबपाणी पायांना रात्री लावून ठेवा. आता सकाळी आठ स्ट्रॉबेरी, २ चमचे बदाम तेल आणि एक चमचा खडे मीठ एकत्र करून पेस्ट बनवावी. आता याचा लेप पायास लावावा व वीस मिनिटांनंतर पाय धुवून घ्या. सोबतच तुम्ही बदामाचा स्क्रब वापरुन पायाच्या भेगा दूर करु शकता. दुसरा उपाय म्हणजे ज्येष्ठमध पावडर आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण ३० मिनिटे पायाला लावून ठेवा.

हे वाचा:   चमचाभर मीठ करेल जादू.! घरातल्या त्रासदायक माशा भरभर कमी होतील.! किचन मध्ये रोज एका कोपऱ्यात ठेवा एकही माशी फिरकणार नाही.!

नंतर कोमट पाण्यानं धुवून घ्या. याने देखील या समस्येवर समाधान मिळेल. सोबतच एक चमचा लोणी, पाव चमचा आंबे ह‍ळद एकत्र करून पायाला मसाज करावा नंतर अर्ध्या तासानं पाय धुवावे. या सर्व नैसर्गिक घटकांच्या मदतीने उपचार करुन तुम्ही तुमच्या भेगा गेलेल्या टाचांची समस्या दूर करु शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.