मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या जीवनात, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, झोपण्याच्या वेळा त्यामुळे आपल्या आरोग्याचा पूर्ण समतोलच बिघडून जातो. या चुकीच्या सवयींमुळे अकाली केस पिकणे हा परिणाम आजकाल सर्वत्र आढळतो. ठीकठाक समस्या बनत चालली आहे. वयोमानानुसार केस पिकणे स्वाभाविक असते परंतु कमी वयामध्ये झपाट्याने केस पिकणे ही एक गंभीर समस्या आहे.
डोक्यात पांढरे केसं चमकू लागले की काळजात चिर्रर्रर्र होत आणि हे आपल्या सौंदर्यात कमीपणा आणतात. रासायनिक उत्पादने यांचा बेसुमार वापर, ताणतणाव तेदेखील प्रामुख्याने केस पांढरे होण्यास जबाबदार घटक आहेत. कमीत कमी रासायनिक उत्पादन वापरा. ताणतणाव घालवण्यासाठी ग्राउंड वर खेळा किंवा योगा प्राणायाम ओंकार जाप यासारखे उपाय करा.
सकस आहार फळे, सॅलेड, हिरव्या पालेभाज्या, दूध, ड्रायफ्रूट यांचे आहारातील प्रमाण वाढवा. खाण्याच्या वेळांचे भान ठेवा. पुरेशी झोप घ्या. लवकर झोपून लवकर उठा. सूर्यनमस्कार करा. हे झाले मूळ जोड उपाय. आज आपण बघणार आहोत काळे केस नैसर्गिकरीत्या कसे काळे करायचे तेही कधी कमी वेळात कमी खर्चात! चला तर मग जाणून घेऊया हा उपाय.
यासाठी आपल्याला लागणार आहे एक बटाटा. याचे साल काढून घ्या. याच्या बारीक फोडी बनवून घ्या. हे एका पॅन मध्ये घेऊन यात एक ग्लास पाणी घाला. हे दहा मिनिटांसाठी उकळवा. यात एक चमचा नेस कॉफी पावडर घाला. हे चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. आता गॅस बंद करून पॅन खाली उतरवा. हे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या. आता एक अंड फोडून त्यातील पिवळा बल्क बाजूला करून त्यात घाला. मिश्रण नीट फेटा. हे मिश्रण आता पांढरे चमकणाऱ्या केसांवर ब्रश किंवा टीश्यू, कापूस कशानेही लावा. हे असेच 2 तास राहू द्या. व नंतर फक्त साध्या पाण्याने धुवा. लक्षात ठेवा शांपू वापरू नका. अगदी कमी वेळेत घरगुती पदर्थापासून हा उपाय आपण करतो त्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट नाही.
आशा आहे तुम्हाला सांगितलेला हा उपाय नक्की आवडला असेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.