ताप आल्यानंतर जो खोकला येतो तो बऱ्याच दिवस का राहतो.! अशा वेळी नेमके काय करायला हवे.! कोरडा खोकला, ओला खोकला, दमा, सर्व समस्यांवर आहे उत्तम इलाज.!

आरोग्य

आज काल आपल्या परिसरात प्रदूषण वाढत चालले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे आणि यामुळेच अनेक छोटे मोठे आजार देखील बळावत आहेत. आताच्या काळात आपल्या आस पास असा एक ही व्यक्ती सापडणार नाही ज्याला कोणत्याच प्रकारचा आजार नाही. आज काल सर्दी पडसे होणे ही एक सामान्य बाब मानली जाते.

खोकला होणे हा सुद्धा आपण एक सामान्य विकार समजून अनेक वेळा याकडे दुर्लक्षच करतो. मात्र हाच खोकला पुढे जावून एक महा भयंकर रोगाचे रुप घेवू शकतो. सर्व प्रथम जाणून घेऊया खोकला निर्माण होण्याची कारणे. मित्रांनो आपल्या घश्यात कफ साचला की त्याची निर्मिती खोकल्यात होते. कफ होण्याची देखील अनेक कारणे आहेत. आजच्या धावत्या जगात व अॅडवांस जीवनशैलीत माणसाला स्वतः साठी अजिबात वेळ नसतो.

आपल्या आहाराकडे देखील बर्याच वेळा आपण नीट लक्ष्य देत नाही. तसेच आता आपली आवड आता जास्त अरबट सरबट व तेलकट तिखट जंक फूडकडे वळत आहे. यामुळे तुम्हाला पुढे बर्याच खोकल्याच्या समस्या जाणवू लागतात. त्याच बरोबर आपल्या गळ्याला वेळेवर आराम न दिल्यास देखील खोकला होवू शकतो. अश्या वेळी आपण लगेच बाजारात जावून कृत्रिम पद्धतीने तयार झालेले औषध व गोळ्या घेतो.

हे वाचा:   माशी आजपासून घरात फिरकणार सुद्धा नाही, फक्त करा हा साधा सोपा उपाय.!

परंतू या गोळ्या आपल्या शरीराला अपाय कारक असतात. मात्र आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला तुमचा खोकला घरच्या घरीच काही दिवसात बरा करण्याचा एक रामबाण उपाय सांगणार आहोत. हा एक घरगुती उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कुठे ही जाण्याची आवश्यकता नाही अगदी घरच्या घरीच तुम्ही हा तयार करु शकता. हा उपाय अत्यंत गुणकारी आहे व आयुर्वेदामध्ये देखील हा लिहून ठेवला गेला आहे.

चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक आहे ते म्हणजे शेंगदाणा तेल अथवा गोडे तेल. हे तेल आपण रोजच्या जेवणात वापरतो त्यातलेच घ्यायचे आहे. तसेच कोणत्या ही किराणा मालाच्या दुकानात हे सहज उपलब्ध होईल. शंभर ते दोनशे ग्राम एवढ्या मात्रेत हे तेल आपणास घ्यायचे आहे. आता यात पुढे वीस ते पंचवीस पाकळ्या लसणीच्या देखील घ्यायच्या आहेत.

लसूण आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर. सर्दी खोकल्यावर लसूण हा एक जुना व उपयुक्त रामबाण उपाय आहे. लसूणच्या पाकळ्या सोलून व मिक्सर अथवा खलबत्यात बारीक वाटून या तेलात टाका. आता गोडे तेल अथवा शेंगदाणा तेल व काही लसणीच्या पाकळ्या एका भांड्यात एकत्र करा व गॅसवर गरम होण्यास ठेवा. आता पुढे यात एक ते दोन चमचे मीठ घाला. दहा ते पंधरा मिनिटे थांब चांगला कड आल्यावर गॅस बंद करा.

हे वाचा:   एकच टॉमेटो असा लावा चेहरा गोरापान होऊन जाईल.! तेलकट त्वचे साठी अति उत्तम आहे हा उपाय.!

आता हे मिश्रण थंड झाल्यास या तेलातून लसूणच्या पाकळ्या काढून टाका. हे तेल एका काचेच्या बरणीत ठेवा. जेव्हा तुम्हाला खोकला लागेल तेव्हा दोन लसणीच्या पाकळ्या घ्या व तेला समवेत चाटण करुन खा. याने तुम्हाला तासांमध्येच खोकल्यापासून आराम मिळू लागेल. या सोबतच अजून एक त्वरित असा खोकल्यावर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हळद व मध यांना एकत्र करुन खा.

हळद व मध हे नैसर्गिक घटक आहेत आपल्या खोकल्यावर हे त्वरित काम करतात व यातून आराम देतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.