आपला भारत देश हा विविध परंपरा आणि संस्कृतींचा वारसा मिळालेला असा एक देश आहे. आपणही या सर्व परंपरा पाळतो आणि फक्त पाळतच नाही तर हे उत्साहाने साजऱ्या करतो. कारण आपल्याकडील चांगल्या परंपरां मागे तितकेच चांगले कारण देखील असते. अशीच एक परंपरा आपण पाळतो. ती म्हणजे दसऱ्याला आपट्याची पानं वाटण्याची. दसऱ्याला आपट्याच्या झाडाची पानं ज्याला आपण सोनं असं म्हणतो ते एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो.
परंतू ही आपट्याची पानं केवळ दसऱ्याला वाटण्या पुरतीच उपयुक्त नसतात तर याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र आपल्या पैकी अनेकांना या पानांचे औषधी उपयोग अनेकांना माहीत नाहीत. आपटा अथवा रेसमोसा नावाच्या झाडाच्या पानांना दसऱ्याला वाटले जाणारे सोने असे देखील संबोधतात. मित्रांनो आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला या आपट्याच्या झाडाच्या औषधी गुणधर्मा विषयी आणि ते विविध आजारांवर कसे वापरायचे याविषयी माहिती देणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते म्हणूनच आमचा हा लेख
शेवट पर्यंत नक्की वाचा.
पोटात होणार्या बिघाडामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खूप जुलाब किंवा अतिसार होत असेल तेव्हा आपट्याची ही पानं तुम्हाला अराम मिळवून देऊ शकतात. या साठी आपट्याच्या पानांचा रस काढावा. रस काढण्यासाठी आपट्याची पानं काहीकाळ पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर ही पानं एका कप भर पाण्यासोबत कुटून घ्यावी. त्यानंतर स्वच्छ सुती कापडातून हा रस गाळून घ्यावा. कांदा आणि मिऱ्यासोबत हा रस घ्यावा. यामुळे तुम्हाला अतिसाराच्या समस्ये पासून त्वरित आराम मिळतो. ताप भरल्यावर अंग दुखी ही सामान्य आहे. होय ताप आलेला असताताना आपले सर्व अंग दुखते. मात्र तुम्हाला जर जास्त प्रमाणात डोकेदुखी होत असेल तर आपट्याची पाने वापरा. या उपायासाठी आपट्याची पाने कुटून त्याचा अर्क अथवा लेप तयार करा आणि तो डोक्यावर लावा. याने तुम्हाला डोकेदुखी मध्ये तुम्हाला हमखास आराम मिळेल.
अनेकदा आपल्या काही कारणास्तव ल’घवीच्या जागी जळजळ होते. ल’घवी करता खूप त्रास होतो अथवा अतिशय उन्हातून तुम्हाला लाल ल’घवी होवू शकते. ही समस्या सामान्य जरी वाटत असली तरी याच आपल्याला खूप त्रास होवू शकतो. परंतू मित्रांनो या समस्येवरही आपट्याची पानं फायदेशीर ठरू शकतात. यासाठी आपट्याच्या पानांचा रस आणि दूध एकत्र सेवन करा. तुम्हाला एखाद्या जागी वेदना होत असेल तर आपट्याचं एक पान घ्या आणि ते ओलं करून वेदना होत असलेल्या जागी लावा. त्यावर चिकटपट्टी लावून ते एक दिवस तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला वेदने पासून अराम मिळेल. ही पाने एक चांगली नैसर्गिक वेदना शामक देखील आहेत. अनेक लोकांना या बद्दल माहिती नसते. तुम्हाला खरचटले असेल अथवा शरीरावर जखमा झाल्या असतील. अश्या वेळी
त्यावर आपट्याच्या पानांचा पल्प लावावा. याने तुमची जखमाही लवकर बरी होईल.
पोटदुखी साठी देखील या बहुगुणी पानांना पाण्यात रात्री भिजवून ठेवावे व सकाळी याच रस काढून मधा सोबत चाटण करून खा. याने तुमच्या पोटात दुखणे लगेच थांबेल. आपट्याच्या पानांचे एवढे फायदे आहेत मात्र आपल्या अनेक जण या फायद्यापासून वंचित आहेत. तुम्ही देखील या आपट्याच्या पानांचा योग्य फायदा करून आपल्या आजारांना नैसर्गिक रित्या बरे करु शकता.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.