आपले शरीर मजबूत व बळकट असणे ही काळाची गरजच आहे. आपण निरोगी असलो तर कोणते ही काम करून आपला उदर निर्वाह अगदी आरामात करू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध प्रकारचा आहार खातो. संतुलित आहार ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला संपूर्ण जीवनसत्त्वे प्राप्त होतील. त्याच बरोबर व्यायाम देखील करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
आज आपण अश्या एका व्यायाम प्रकारा बाबत पाहणार आहोत जो आपल्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक दुखणी हा व्यायाम केल्याने बरी होतात. व्यायाम हीच आपल्या चांगल्या आरोग्याची किल्ली आहे.चला तर जाणून घेऊया हा व्यायाम प्रकार आणि याचे काही महत्त्वाचे फायदे. हा व्यायाम प्रकार करताना सर्व प्रथम खाली झोपा व आपल्या हातांच्या आधारावर वर या.
या प्रकाराला प्लांक म्हटले जाते. रेस्पिरेटरी प्रेशर अर्थात श्वसन दबावाचा सरळ संबंध हा आतड्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला जातो. पण प्लांक या आसनामुळे श्वासाची प्रक्रिया मुख्य भूमिका निभावते. त्यामुळे श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होते. तसंच हे सुधारल्यामुळे श्वासासंबंधित विकारही होत नाहीत आणि रेस्पिरेटरी प्रेशर योग्य राहते.
प्लांकच्या योगामुळे शरीराला अधिक मजबूती मिळते. तसेच शरीराशी संबंधित मांस पेशीमध्ये देखील सुधारणा आणण्याचे काम हे हा योग करतो. याचा सकारात्मक प्रभाव शरीरावर पडतो. तसंच मांसपेशीची गतीविधी वाढवून त्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा फायदा होतो. कित्येक महिलांना पाळी नियमित न होण्याचा त्रास होतो. पण तुम्ही नियमित प्लांक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो.
अनियमित पाळी समस्या असेल तर त्यासह थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी, चिडचिडेपणा हे सर्व एकत्र येतं आणि या सर्वावरील एकच उपाय आहे तो म्हणजे प्लांक हा व्यायाम. मासिक पाळी नियमित आणण्यासाठी या व्यायाम प्रकारचा फायदा होतो. सध्या आपल्याकडे अनेक जणांना तणावापासून मुक्ततेची जास्त गरज भासते. सतत काम आणि घरच्या ताणामुळे अनेक आजार आपण ओढवून घेत असतो.
सूर्य नमस्काराच्या योगमुळे ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि तुमची दृष्टीही सकारात्मक होण्यास मदत मिळते. केस आणि त्वचा खराब होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण ठरते ते म्हणजे चिंता आणि तणाव. मन शांत राखण्यासाठी प्लांक या व्यायामाचा प्रयोग करण्यात येतो.
ही प्रक्रिया तुम्हाला शांत करते आणि त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांच्या वाढीतही सुधारणा होते. मुळात चिंता आणि तणावमुक्त झाल्यानंतर अन्य कोणतेही आजार आपल्या आजूबाजूला फिरकत नाहीत हा याचा सर्वात मोठा फायदा आहे.त्याच बरोबर आपल्या भारता देशात सूर्यनमस्काराची परंपरा अनेक पिढ्यांपासून सूरू आहे आणि योगासनांमध्ये याला सर्वोत्कृष्ट मानलं जातं. पण अनेकांना सूर्यनमस्काराचे फायदे माहीत नाहीत.
त्यामुळे जाडेपणामुळे वैतागलेली लोकं योगा सोडून जिम आणि साईड ईफेक्ट्स होणाऱ्या औषधांचा वापर करतात. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही रोज सूर्य नमस्कार केले तर तुम्ही फिट तर राहताच पण अनेक आजारांपासूनही दूर राहता. जर वेटलॉस करायचा असेल तर रोज कमीतकमी 10 वेळा सूर्य नमस्कार करा आणि वजन कमी करा. दररोज व्यायाम केल्यास आपले अनुमान देखील वाढेल.
व्यायाम करा आणि रोगांना शरीरापासून दूर ठेवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.