मंगळसूत्र गळ्यात का टाकतात.? मंगळसूत्रला सौभाग्यच लेणं का म्हणतात.? खूपच कमी लोकांना माहित आहे याबद्दल.!

अध्यात्म

आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशा काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टीमुळे आपल्याला अनेकदा विशिष्ट अशी ओळख सुद्धा मिळत असते. आपल्या अनेक धर्मांमध्ये सुद्धा असे वेगवेगळे अलंकार आहेत त्या अलंकाराच्या माध्यमातून स्त्रियांना एक विशिष्ट ओळख प्राप्त होत असते. कोणत्याही अलंकार स्त्रियांना परिधान करायला आवडत असतात मग ते सोन्याचे असुदे चांदीचे असू दे किंवा बनावटीचे असुदे प्रत्येक महिला प्रत्येक दागिना तितक्याच आवडीने परिधान करत असते परंतु आपल्या समाजामध्ये असे काही दागिने आहेत ते दागिने प्रत्येक जण घालू शकत नाही.

त्या दागिण्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्या दागिन्यांच्या आधारेच महिलांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. तुम्हा सर्वांना कल्पना आलीच असेल की आज आपण कोणत्या दागिने याबद्दल जाणून घेणार आहोत. अगदी योग्य मंगळसूत्र. मंगळसूत्र हा असा एक दागिना अलंकार आहे जो प्रत्येक विवाहित महिला साठी महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा मंगळसूत्र तिच्या गळ्यात तिच्या नवऱ्या द्वारे टाकले जाते आणि हेच मंगळसूत्र सौभाग्याचं प्रतीक देखील मानले जाते. हा फक्त एक अलंकार नसून पती बद्दल आदर सन्मान भावना इत्यादी गोष्टी व्यथित करणारा दागिना आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंगळसूत्र बद्दल अनेक महत्त्वाच्या काही गोष्टी.

हे वाचा:   माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक तांब्या पाण्याचा करा हा सोप्पा उपाय; धन संबंधित समस्या होतील कायमच्या दूर.!

सध्या बाजारामध्ये वेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र उपलब्ध असतात.हल्ली मंगळसूत्र परिधान करणे एक फॅशन देखील मानले जाते आहे परंतु मंगळसूत्र आहे जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरते तेव्हा तिच्या नवऱ्या द्वारे गळ्यामध्ये टाकले जाते. मंगळसूत्र मध्ये दोन वाट्या, काळ्या मणी व चार सोन्याच्या मणी असतात. मंगळसूत्र हे नवरा-बायको यांच्या अतूट विश्वासाचे नाते संबोधित करणारे महत्त्वाचे अलंकार मानले जाते.

आपल्या पतीवर चे सर्व संकट दूर करण्याचे एक महत्त्वाचे साधन देखील मानले गेलेले आहे व या मंगळसूत्र मध्ये आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी शक्तीसुद्धा लाभलेली असते आणि म्हणूनच प्रत्येक सवाष्ण स्त्री आपल्या पतीचे वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी मंगळसूत्र परिधान करते व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करते.

मंगळसूत्र मध्ये ज्या दोन मोठ्या वाट्या असतात त्याचा अर्थ पती-पत्नी यांचे नाते होय. आणि चार आजूबाजूला छोट्या मनी असतात त्यांचा अर्थ धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष याचे प्रतीक असतात. मंगळसूत्र मधील दोन वाट्या शिवशक्ती यांचे प्रतीक देखील संबोधलेले आहे. एक वाटी शंकराचे प्रतीक व दुसरी शक्तीचे म्हणूनच संसारातील हे दोन महत्त्वाचे घटक असून यापुढे सुद्धा स्त्रीला शिवशक्ती प्रमाणेच स्त्री एकत्रित राहून आनंदाने संसार करायचा आहे व त्याचबरोबर माहेरची कुलस्वामिनी सोडून सासरच्या कुलस्वामिनीला समर्पित व्हायचे आहे.

हे वाचा:   अशाप्रकारच्या शिवलिं"गाची पूजा करा, इतके पैसे येतील की मोजता मोजता वेडे व्हाल.!

सासरच्या देवीची पूजा-अर्चना करून आपल्या पतीसोबत संसार करायचा आहे. असे म्हटले जाते की, मंगळसूत्र मधील मणी आपल्या संसारातील सर्व संकटे दूर करतात. प्रत्येक राज्यामध्ये मंगळसूत्र वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात परंतु या मंगळसूत्र मागील भावना मात्र सगळीकडे सारखेच पाहायला मिळते.तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये मंगळसूत्र म्हणून एक काडी धाग्याला बांधलेली असते.

आणि अशा वेळी पत्नी च्या गळ्यामध्ये टाकले होते त्याचबरोबर ज्या पद्धतीने हातामध्ये हिरवा चुळा ही सौभाग्याचे लेणे मानले जाते त्याचबरोबर सौभाग्याचे लेणे मानले जाते मंगळसूत्र मुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे हल्ली फॅशन मंगळसुत्राचा स्वरूप आकार जरी बदलला असला तरी त्यामागील भावना मात्र तशीच्या तशी आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.