ज्या महिलेचे हे ५ अंग असतात खूपच मोठे त्या असतात खूप भाग्यशाली, जाणून घ्या.!

अध्यात्म

आपल्या समाजामध्ये स्त्रीला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. ज्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर केला जातो व त्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते परंतु आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक असे काही कुटुंब आहेत, ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान सत्कार केला जात नाही. अशा ठिकाणी माता महालक्ष्मी चुकून सुद्धा राहात नाहीत. त्या ठिकाणी नेहमी कटकटी ,पिडा यांच्या गोष्टी घडत असतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांना महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये महिलेला साक्षात माता महालक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांचे मान सन्मान करण्यात आलेले आहे व देण्यात आलेले आहे प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये महिलाची उपस्थिती महत्त्वाची मानली गेलेली आहे.

असे कोणतेच कार्य नाही यात महिलांचा समावेश असतो आणि म्हणूनच महिला ही सर्वसमावेशक अशी आहे. प्रत्येकाने महिलेचा आदर-सन्मान करायलाच हवा. महिला मुळेच आपण जन्म घेतो आणि महिला मुळेच आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. आपला हिंदू धर्म शास्त्रांमध्ये महिलांच्या शरीराविषयी किंवा त्यांच्या गुणधर्माविषयी देखील लिखाण करण्यात आलेले आहेत व अशा काही महिला आहेत ज्या त्यांच्या अंगी असलेले भाग्यपण व गुणधर्मांमुळे आपल्या कुटुंबासाठी व भविष्यासाठी लाभदायक मानले गेलेले आहेत. महिलांविषयी अशा काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने जाणून घ्यायला हव्यात चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी..

ज्या घरामध्ये मुली जन्माला आलेल्या असतात त्या घरांमध्ये नेहमी माता महालक्ष्मी वास्तव्य करत असते त्या घरामध्ये सुख शांती वैभव नेहमी नांदत असते परंतु हल्ली अनेकांच्या घरांमध्ये मुलगी जन्माला आल्यावर अनेकांच्या कपाळी आठ निर्माण होत असतात. प्रत्येकाला मुलगा हवा असतो. हे अत्यंत चुकीचे आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे चुकीचे आहे.

जर तुमच्या घरा मध्ये मुलगी असेल तर तिचा सन्मान करा. तिचा आदर करा कारण की प्रत्येक मुलगी ही आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी मुलांपेक्षा अधिक सक्षम असते. आजच्या लेखामध्ये आपण स्त्रीच्या शरीराविषयी अशा काही पाच महत्त्वाच्या अवयवांना बद्दल जाणून घेणार आहोत जे अवयव तिच्यासाठी व कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे व भाग्यशाली मानले गेले आहे.

हे वाचा:   जेवणाच्या ताटात किंवा डब्यामध्ये कधीही देऊ नये तीन पोळ्या; जाणून घ्या काय आहे यामागील कारण.!

आपल्या इथे अनेक शास्त्र आहेत. वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, समुद्रशास्त्र, गरुड पुराणामध्ये स्त्री आणि शरीरात पुरुष यांच्या शरीराबद्दल काही महत्त्वाचे वर्णन करण्यात आलेले आहे.अनेकदा ज्या स्त्रीचे डोळे मोठे असतात अशा स्त्रिया आपल्या पतीवर नेहमी खूप प्रेम करत असतात. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असतात. आपल्या पतीवर नेहमी विश्वास ठेवत असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या स्त्रिया ज्या ठिकाणी असतात तिथे नेहमी सुख शांती वैभव नांदत असते.

केस हा स्त्रियांचा अलंकार आहे. ज्या महिलांचे केस लांब सडक असतात, काळेभोर असतात अशा महिला प्रत्यक्ष माता महालक्ष्मी चे स्वरूप मानलेले असतात आणि या महिला खूपच नशीबवान असतात.ज्या ठिकाणी लांब केस असणाऱ्या महिलांचा वास्तव्य असतो अशा ठिकाणी कधीच पैशांची कमतरता निर्माण होत नाही. या महिला आपल्या पतीला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात व त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांवर नेहमी विश्वास ठेवून त्यांच्यावर जीव ओवाळत असतात.

अशा महिला ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे संकट सहसा येत नाही. या महिलांचे बोट खूप लांब आणि दिसायला आकर्षक असतात अशा प्रकारच्या महिला स्वभावाने चतुर आणि हुशार असतात. या महिलांना वाचनाच्या लेखनाची आवड असते या महिला स्वभावाने जराशा बचत करणारे असतात आणि म्हणूनच कोणतेही आर्थिक व्यवहार करत असताना या महिला नेहमी सावधानता बाळगून करत असतात. या महिला नेहमी भविष्याचा विचार करत असतात आणि त्याची पूर्तता वर्तमान काळापासूनच करत असतात म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या महिला वास्तव्य करतात त्या ठिकाणी एक उत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळते.

हे वाचा:   घरामध्ये स्त्रियांनी या गोष्टीची काळजी घेतली तर कधीही घरात कशाचीही कमतरता भासणार नाही; माता लक्ष्मी चा निरंतर वास तुमच्या घरात राहील.!

या महिलांचे नाक लांब आणि सरळ असते अशा प्रकारच्या महिला स्वभावाने स्वाभिमानी असतात आणि स्वभावाने शांत असतात. प्रत्येक समस्येवर या महिला अगदी शांतपणे आणि विचारविनिमय करूनच आपली प्रतिक्रिया देत असतात.या महिला कोणतेही कार्य करत असताना आपले 100% देण्याचा प्रयत्न करतात.

जर कार्य मनापासून झाले नाही तर ते चिडचिड करतात आणि म्हणूनच एखादी हाती घेतलेले कार्य शंभर टक्के पूर्ण करून त्यात यश मिळवण्याचा या महिलांचा मानस असतो. या महिलांचा ज्या पुरुषासोबत विवाह होतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव येत असते कारण की या महिला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करत असतात आणि म्हणूनच पुरुषांना सुद्धा या महिलांच्या वागणुकीमुळे नेहमी फायदा होत असतो.

ज्या महिलांची मान उंच आहे अशा प्रकारच्या महिला खूपच भाग्यवान मानले जातात. या महिला स्वभावाने खूप आनंदी आणि मोकळ्या स्वभावाची असतात या महिला नेहमी सकारात्मक विचार दृष्टिकोन ठेवत असतात आणि म्हणूनच या महिलांच्या संपर्कात असणारे अन्य मंडळी देखील नेहमी सकारात्मक विचार करत असतात. ज्या पुरुषाचे अशा प्रकारच्या महिलांशी विवाह होतो त्या पुरुषांच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती तर लागतेच पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.