महिलांनो चांदीचा एकही दागिना आता काळा पडणार नाही.! ज्यांना हवे आहेत चांदीचे स्वच्छ दागिने त्यांनी त्याला लावायचे आहे हा एक पदार्थ.!

ट्रेंडिंग

कोणतीही महिला असो प्रत्येकीला सजावे नटावे वाटत असते. प्रत्येकीकडे काही ना काही दागिना तर असतोच. परंतु असे काही दागिने असतात ज्यांची साफसफाई ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चांदीचे दागिने कशाप्रकारे स्वच्छ ठेवावे याबाबत माहिती सांगणार आहोत. असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्ही चांगल्या प्रकारे वापरून तुमचे चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे पांढरे शुभ्र बनवू शकता.

यासाठी जास्त खर्च देखील येणार नाही तुम्ही अगदी घरातील काही पदार्थ घेऊन हे चांदीचे दागिने स्वच्छ करू शकता यासाठी तुम्हाला खूप सोप्या अशा ट्रिप्स फॉलो करायचा आहे. तुम्ही काही मिनिटांत जुन्या चांदीची चमक बनवू शकता. यासाठी तुम्ही काही प्रभावी घरगुती टिप्स वापरू शकता. दिवाळीत चांदीच्या वस्तूंची जास्त गरज असते. सणाच्या वेळी तुम्ही या कल्पना वापरून पाहू शकता.

चांदीचे दागिने किंवा भांडी जितकी जुनी होतात तितकी त्याची चमक कमी होऊ लागते. अनेक वेळा घरात ठेवलेल्या चांदीच्या वस्तू इतक्या काळ्या होतात की त्या ओळखणे कठीण होते. सणासुदीत अनेकदा चांदीचे दागिने किंवा भांडी लागतात, अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी घरगुती टिप्स अवलंबू शकता. त्यामुळे चांदी चमकू लागेल.

हे वाचा:   हळदी सोबत या वस्तूचा वापर केल्यास ८ दिवसात या वस्तूच्या वापराने सोनचाफा फुलांनी भरगच्च होईल.!

गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळा, आता ही पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर किंवा भांड्यांवर ब्रशच्या मदतीने घासून घ्या. हे धुऊन कोरडे केल्यावर काळेपणा दूर होईल. चांदीचे दागिने साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा देखील वापर करू शकता. चांदी साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता. ब्रशच्या मदतीने चांदीवर टूथपेस्ट लावा. नंतर गरम पाण्यात बुडवून ठेवा, काही वेळाने बाहेर काढा आणि कोरड्या कपड्याने पुसून टाका.

विनेगर हे चांदीचे किंवा सोन्याचे तसेच पितळाचे कुठलेही भांडे स्वच्छ करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले जाते विनेगर द्वारे तुम्ही तुमच्या चांदीमध्ये असलेली घाण पूर्णपणे नष्ट करू शकता. व्हिनेगर चांदीचा काळेपणा देखील दूर करतो. व्हिनेगरमध्ये मीठ मिसळा, नंतर हे द्रावण चांदीवर लावा आणि थोडा वेळ राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवा. फरक दिसून येईल.

टोमॅटो सॉस: टोमॅटो सॉसने चांदीचा काळेपणा दूर केला जाऊ शकतो. आपण चांदीवर टोमॅटो सॉस लावा आणि 30 मिनिटे सोडा. यानंतर, चांदी स्वच्छ कापडाने घासून स्वच्छ करा, नंतर कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने चांदीची चमक परत येईल. डिटर्जंट पावडर: चांदी साफ करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर देखील वापरू शकता. गरम पाण्यात डिटर्जंट पावडर मिसळा, आता त्यात चांदी टाका आणि थोडा वेळ राहू द्या.

हे वाचा:   अशी मुलगी असेल तुमची गर्लफ्रेंड तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची होऊ शकते माती, वेळीच सावध व्हावे.!

नंतर चांदी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे काळेपणाही दूर होतो. सॅनिटायझर: हँड सॅनिटायझरने तुम्ही चांदी स्वच्छ करू शकता. सर्व प्रथम, सॅनिटायझर एका भांड्यात ठेवा, आता त्यात चांदी भिजवा आणि 30 मिनिटे सोडा. त्यानंतर स्क्रबच्या साहाय्याने चोळा, यामुळे काळपटपणा दूर होईल. फॉइल पेपर: ॲल्युमिनियम फॉइल पेपर, जे अन्न पॅक करण्यासाठी वापरले जाते. याचा वापर करून तुम्ही चांदीला चमक देऊ शकता.

यासाठी एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्यात चांदी टाका. काही वेळाने ते पाण्यातून बाहेर काढून फॉइल पेपरने घासून घ्या. त्यामुळे चांदी चमकते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.