मित्रांनो आपल्या भारत देशाची भूमी वैविध्य पूर्ण जडीबुटी ने नटलेली आहे. आज आम्ही तुम्हाला खूप उपयोगी वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ती म्हणजे जांभूळ.. जामून..मधूमेहात वरदान असे जांभळाचे फळ आपण सगळ्यांनी खाल्लेच आहे. गोड तुरट चवीचे जांभूळ खाऊन कित्येक समस्या दूर होतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की जांभळाच्या पानामुळे सुद्धा तुम्ही खूप साऱ्या समस्या दूर करू शकता.
चला तर मग जाणून घेऊया जांभळाच्या पानां मुळे होणाऱ्या फायद्याबद्दल.. पहिला फायदा, डोळे लाल होणे किंवा डोळ्यात काही त्रास होणे. लहान असो किंवा मोठा असो सगळ्यांनाच डोळ्या संबंधित त्रास होतोच. यासाठी तुम्ही १५-२० जांभळाची कोवळी पानं घ्या. ४००मिली पाण्यात उकळा. जेंव्हा हा काढा ¼ होईल त्यानी डोळे धुवा. यामुळे डोळे दुखी मध्ये होतो.
कधी कधी कानातून पु येण्याची समस्या भेडसावते. अशा वेळी, तुम्ही जांभूळ बी मधात घोळून १-२ थेंब कानात टाका. असं केल्याने कानाचे वाहणे ठीक होते. सोबतच जेवणाच्या सवयी बदलांमुळे अंगात उष्णता वाढल्यामुळे तोंड येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्ही जांभळाच्या पानांच्या रसाने गुळना केल्यास लाभ होईल. जर तुम्हाला सतत मळमळत असेल, उलटी होत असेल तर आंब्याची व जांभळाची कोवळी पाने सम प्रमाणात किंवा २० ग्रॅम प्रमाणात घ्या.
४००मिली पाण्यात उकळून काढा ¼ बनवा. थंड करून प्यावे. असं केल्याने उलटी होणे बंद होईल. खाज /गाऊट / गजकर्ण /नायटा झाला असेल तर मित्रांनो जांभळाच्या पानांचा रस आणि लेप संबंधित जागी लावा. असे दिवसातून तीनदा करावे. तुम्हाला ४-५ दिवसात फरक जाणवेल. जर तुम्हाला मुतखड्याचे समस्या असेल तर १०-१५ ग्रॅम जांभळाची कोवळी पानं कुटून पेस्ट बनवा. यात २-३ काळी मिरी वाटून मिसळा.
सकाळ संध्याकाळ याचे सेवन करावे. असं केल्याने मुतखडा लघवी वाटे निघून जाईल. आशा आहे वर दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच नवीन वाटली असणार आणि आवडली असणार..आवडल्यास शेयर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.