खूप उपाय करून थकलात, आता एव्हढे एक काम जेवण केल्यावर करावे, दुपटीने होईल वजन कमी.!

आरोग्य

प्रत्येकाला आपण फिट राहावे असे वाटत असते. फिट राहणे म्हणजे नको असलेली चरबी कमी करणे. दिवसेंदिवस चुकीच्या खान पणामुळे व आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे दिवसेंदिवस पोटाची शरीराची चरबी ही वाढत जात असते. हळूहळू वजन देखील वाढले जाते. त्यामुळे आपण खूपच समस्येत असतो. अशा वेळी आपण वेगवेगळे उपाय करून बघत असतो.

परंतु केलेल्या या उपायांचा आपल्याला तेवढा फायदा होत नाही. अनेक उपाय आपल्याला सांगितली जातात आपण हे उपाय त्या पद्धतीने करत देखील असतो परंतु आपल्या पदरी शेवटी निराशाच येत असते. हेही शक्य नसले तर अनेक लोक शेवटी विविध प्रकारच्या डॉक्टरांकडे जाऊन डायटिंग प्लॅन बनवून घेत असतात. अनेक लोक तर बाजारामध्ये उपलब्ध असलेले विविध औषधे यावर आजमावून बघत असतात.

परंतु काही एक फायदा होत नाही. आम्ही तुम्हाला आजच्या या लेखांमध्ये एक असे आसन सांगणार आहोत जे तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच करायला हवे. हे आसन केल्याने तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काही दिवसातच फरक झालेला दिसेल. अतिशय सोपे हे आसन कशा प्रकारे करायचे आहे व कधी करायचे आहे? तसेच करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे आपण या लेखाद्वारे सविस्तर पणे पाहूया.

हे वाचा:   गुळाचे हे फायदे बघून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.! गूळ शरीरात जाऊन हे काम करतो.! प्रत्येकाला माहिती असायला हवे.!

आपली पचनशक्ती वाढविण्यासाठी आणि आपले वजन नियंत्रणात ठेण्यासाठी आपण नियमितपणे वज्रसन करावे. हे आपले वजन देखील कमी करेल. वज्रासन करून पोटाच्या समस्या दूर राहतात. वज्रासन म्हणजे मजबूत स्थिती. हे आसन पाचन शक्ती आणि स्नायूशक्ती देत असते, म्हणूनच त्याला वज्रासन असे म्हणतात.

वज्रासन कशा प्रकारे केले जाते हे आपण पाहूया. १)सर्व प्रथम, आपण एक आसन घालावे. २) आसन वर आता दोन्ही पाय गुडघ्यातुन वाकून टाचांवर बसा. ३) आपल्या पायाची दोन्ही बोटे एकमेकांना भेटली पाहिजेत. ४) नितंब पायांच्या तळांवर असावेत. ५) आता आपले कंबर सरळ ठेवा आणि दोन्ही हात कोपर न वाकवता आपल्या गुडघ्यावर ठेवा. ७) मांडी वर हात ठेवा आणि समोर सरळ पहात रहा. ७) हे आसन सुरुवातीला 5 मिनिटे करा, नंतर ते 15 मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत वाढवता येते. ८) हे असे आसन आहे की आपण जेवण केल्यावर 5 मिनिटेही करू शकता.

हे वाचा:   हा एक पदार्थ बदलून टाकेल तुमचे संपूर्ण आयुष्य, या बिया आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *