मित्रांनो तुम्हीदेखील बद्धकोष्ठतेचा त्रासामुळे हैराण असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असा एक उपाय ज्याला तुम्हाला रोज रोज करण्याची देखील आवश्यकता नाही. फक्त केवळ एक वेळच्या उपायाने तुमचे पोट अगदी त्वरित साफ होईल. बद्धकोष्ठतेचा त्रास सोबतच्या लोकांना पोटामध्ये जळजळ होणे, ऍसिडिटी होणे, गॅसेस होणे, अपचनामुळे करपट ढेकरा येणे त्यांच्यासाठी देखील एक उपाय आम्ही तुम्हाला सांगू.
असे दोन उपाय आज आम्ही तुमच्या पोटाच्या तक्रारींवर तुमच्या सोबत शेयर करत आहोत. उपाय १: या उपायातील प्रमुख घटक आहे एरंडीचे तेल ज्याला इंग्रजीमध्ये आपण castor oil म्हणून देखील ओळखतो. हे बाजारात तयार मिळते व फार महागही नसते. एक वेळेस छोटी बाटली आणून ठेवली तर अनेक महिने वापरता येते. कारण याचा वापर एका मर्यादेपर्यंतच करायचा असतो.
सगळ्यात आधी एरंडीचे तेल एक चमचा घ्या. यामुळे तुमचे पोट अधिक चांगल्या प्रकारे सहज साफ होईल. ज्यांना जुनी बद्धकोष्टता अनेक दीर्घ काळापासून चालत आली आहे त्या व्यक्तींनी या एरंडेल तेलाचे दोन चमचे घ्यावेत. काही लोकांचा कोठा जड असतो. त्यामुळे साफ होण्यास वेळ लागतो. परंतु लक्षात ठेवा एरंडीच्या तेलाचे सेवन तुम्हाला रोज करायचे नाही.
जेव्हा हे खूपच जास्त बद्धकोष्टता जाणवत आहे पोट साफ झाले नाही जाणवत असल्यास हा उपाय करावा. कशा पद्धतीने सेवन करावे? यासाठी तुम्हाला एक ग्लास गरम दूध घ्यायचे आहे. गाईचे किंवा म्हशीचे कोणतेही दूध चालेल. कमी स्निग्ध पदार्थ असल्याने आम्ही तुम्हाला गायीचे दुध वापरण्याचा सल्ला देऊ. दूध खूप खडक नसावे पिण्याजोगे गरम असावे. वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या बद्धकोष्ठतेचा प्रमाणानुसार त्यामध्ये एक किंवा दोन चमचे एरंडीचे तेल घाला.
यापेक्षा जास्त प्रमाणात एरंडीच्या तेलाचे सेवन एकावेळेस करू नये. हे तेल आणि दुध चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे तेल वर तरंगते त्यामुळे पिताना देखील चमच्याने वारंवार हलवावे लागते. असे तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर एक तासांनी करायचे आहे. अनेक जणांना याच्या वासाने किंवा जास्त प्रमाणात घेतल्यामुळे उलटी होण्याची शक्यता असते. विचित्र चव असल्यामुळे अनेक लोकांना याची सवय नसते यामुळे पहिल्यांदाच प्रयोग करत असाल तर एकच चमचा घ्या.
तुमच्या जिभेला तसेच शरीराला हे तेल सूट होण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. हा उपाय करते वेळी हे दिवसात तुम्ही करणार नाही याची दक्षता घ्या कारण हा उपाय केल्यानंतर तुमचे पोट साफ होणार आहे. रात्री हा उपाय करुन झोपल्यानंतर सकाळी अगदी सहजपणे उत्तम प्रकारे तुमचे पोट साफ होईल.
उपाय २: या उपाय यासाठी तुम्हाला ऑलिव्ह ऑइल (जैतून चे तेल ) लागणार आहे. हे तेल आपल्या पोटासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. ज्यांना गॅस, एसिडिटी आणि करपट ढेकरा येण्याची समस्या असते त्यांच्यासाठी हे अत्यंत लाभदायक असते. कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ल्यानंतर ज्यांना छातीत पोटात सतत जळजळत राहते अशा लोकांनी हा उपाय केल्यानंतर त्यांना त्वरित आराम मिळेल.
एकदा ज्या लोकांना हा उपाय सूट झाला त्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक असा उपाय आहे. त्यांना आयुष्यात कधीही अशा पोटाच्या तक्रारी सतावणार नाहीत. एक ते दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घ्या. दिवसातून फक्त एकदाच करा. उपाय चांगला आहे तरी देखील याला मर्यादा आहेत. याचे सेवन कसे करावे? तुम्ही हे तेल कोमट दुधामध्ये घालून याचे सेवन करू शकता.
पाण्यामध्ये टाकून करू शकता. अगदी कोऱ्या चहा मध्ये देखील असे तेल घालून तुम्ही हा प्रयोग करू शकता. अनेक लोकांना दुधामुळे देखील गॅस एसिडिटी ची समस्या उद्भवते. त्यांनी दुधाऐवजी पाण्याचा प्रयोग करावा. ज्या लोकांना चहा पसंत आहे त्या लोकांनी कोऱ्या चहा मध्ये या तेलाचे सेवन करावे. सुरुवात तुम्ही एक चमचा तेलाने करा. चांगले वाटल्यानंतर तुम्ही दोन चमचे देखील घेऊ शकता. लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे.
हे संध्याकाळी करू नका. यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस चांगले वाटेल. तुमचे पोट हलके राहील. तुम्हाला ताजेतवाने वाटेल. दूध, पाणी किंवा कोरा चहा या सोबत तुम्हाला या तेलाचे सेवन करायचे नसल्यास तुम्ही जे सॅलेड खाता त्यावर देखील दोन चमचे हे तेल घालून तुम्ही खाऊ शकता. हे तेल तुम्ही चपाती वर घालून देखील खाऊ शकता. हे तुमच्यावर अवलंबून आहे कशाप्रकारे तुम्ही याचे सेवन करणे तुम्हाला आवडत आहे किंवा सोपे जाते.
दिवसभरात जर तुम्ही ज्यूस पीत असाल तर त्यामध्ये देखील हे तेल घालून तुम्ही ज्यूस पिऊ शकता. याची चव खाण्यामध्ये वेगळी नसते परंतु तेलच शेवटी! परंतु याचे फायदे अनेक लाभदायी आहेत. ज्यांना सांधेदुखीची, हाडं आखण्याची समस्या असते त्यांच्यासाठी व हृदयाशी संबंधित अनेक आजार असतील तर यावर देखील हे तेल अत्यंत फायदेशीर असते. या तेलामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल देखील जमा होत नाही.
शरीरातील सर्वच घाण बाहेर काढण्यासाठी हे तेल महत्त्वाचे आहे. बद्धकोष्टता वाला पहिला उपाय लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांनी करू नये. हे उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि त्यांचाही फायदा करून द्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.