पांढरे शुभ्र दात बनवायचे असतील तर याहून सोपा उपाय शोधूनही सापडणार नाही.! दातांना एका झटक्यात पांढरे करतो हा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो हसरा चेहरा आपल्या सगळ्यांनाच आवडतो. दात आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अंग आहे. यांच्याशिवाय किंवा यांच्या सफेदीशिवाय आपले सौंदर्य खुलून येत नाही.सफेद व चमकदार दात सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतात आणि त्या दातांवर हास्य सुद्धा छान दिसते.यासाठी आपल्या दातांचे सफेद असणे, स्वच्छ असणे व चमकदार असणे खूप आवश्यक आहे.

जेव्हा आपण हसतो तेव्हा जर आपले दात पिवळे असतील तर ते चांगले दिसत नाही. दातांच्या पिवळेपणामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. जर आपले दात पिवळे असतील, त्यामध्ये काळे डाग असतील तर यासाठी आपण बरेच उपाय करतो, डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेतो वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरतात. परंतु काही घरगुती उपाय खूप गुणकारी ठरतात. मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे.

जे अत्यंत घरगुती व उपयुक्त आहेत. चला तर पाहूया हे उपाय. पहिल्या उपयासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. त्यांना मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे. आपण तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. दुसरी गोष्ट जी घ्यायची आहे ती म्हणजे पुदीन हराच्या गोळ्या. जर तुमच्याकडे ताजी पुदिन्याची पाने असतील तर तुम्ही त्याचा नक्की वापर करा व जर नसल्यास काही हरकत नाही मेडिकलमध्ये पुदीन हराच्या गोळ्या सहज उपलब्ध होतील.

हे वाचा:   कुठलाही आजार यापुढे टिकला तर बोला, फक्त दोनच पाने काम तमाम करतील.!

या गोळ्यांमुळे आपल्या तोंडाचा घाण वास येत नाही व बऱ्याचवेळा दातांमध्ये कीड लागते तर ते घालवण्याचे देखील काम गोळ्या करतात. पुदिन्यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपल्या दातांमध्ये कीड लागल्यामुळे जी फट निर्माण होऊन ते दुखू लागते त्यालाही हे बरे करते. आपणास पुदीन्याच्या दोन किंवा तीन गोळ्या घ्यायच्या आहेत. २ चमचे घेतलेल्या तांदळाच्या पिठामध्ये दोन चमचे गुलाब जल टाकून ते नीट मिक्स करायचे आहे.

गुलाब जल नसल्यास दोन चमचे कोमट पाणी देखील वापरू शकता. मिक्स करून झालेल्या तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आता पुदिन हरा गोळ्यांचे रस टाकून तो देखील नीट मिक्स करून घ्यायचे आहे. तयार झालेल्या मिश्रणाने दात ब्रशने नीट मसाज करून घासायचे आहेत. कमीत कमी दोन मिनिटे तरी नक्की मसाज करा. त्यानंतर चुळ भरून दात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्हाला पहिल्या वापरानंतरच फरक जाणवू लागेल.

दातांचे पिवळेपणा कमी झालेले दिसेल. दातांना सफेदी येण्यासाठी तांदळाचे पीठ उत्तम असते. या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतात नसतील तर पुदीन हरा गोळ्या जवळच्या मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. हा उपाय नियमीत केल्याने अगदी थोड्याच दिवसांमध्ये तुमचे दात सफेद, चमकदार होतील. चला जाणून घेऊया दात पिवळे पडण्याचे नक्की कारण काय असते? तर ते म्हणजे स्वच्छतेची कमतरता.

हे वाचा:   एका आठवड्यात दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकते फक्त आपला डाइट प्लान असा असायला हवा.! वजन कमी करणे खूप सोपे असते.!

जर आपण नीट ब्रश नाही केले तर आपले दात खराब होऊ लागतात. जास्त तं’बाखूचे सेवन केल्याने,दा’रू प्यायल्याने तसेच खूप जास्त चहा व कॉफी प्यायल्याने देखील आपले दात खराब होऊ लागतात. त्यासाठी दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी नक्की दात घासावे. जर शक्य असेल तर कडुलिंबाच्या झाडाच्या काडीने नक्की ब्रश करावे. कधीकधी मिठानेसुद्धा दात घासावे.

चिमुटभर मीठ दातावर लावून दात घासावे. तसेच तुम्ही कधीकधी चिमुटभर खाण्याच्या सोड्यामध्ये एक थेंब लिंबाचा रस मिक्स करून फक्त दातांवर लावून दात घासावे. हा उपाय केल्याने आपले दात मजबूत होतील, तोंडाचा घाण वास येणार नाही. नक्की हा उपाय करून पहा. यामुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही या उलट आपल्या हिरड्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम होण्यास मदतच होते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.