रोज फक्त दोन केळी खाल्याने काय होते माहिती आहे का.? केळ्याचे असे फायदे तुमचे मन थक्क करून टाकेल.! फक्त अशा वेळीच खावी केळी.!

आरोग्य

जेवणानंतर फळे खाणे ही एक आरोग्याच्या द्रुष्टीने उत्तम सवय आहे आणि डॉक्टर देखील रोज एक फळ खाण्याचा सल्ला आपल्याला देतात. फळांमध्ये अनेक शरीर उपयुक्त मिनरल्स, विटामीन्स व जीवनसत्वे असतात जी आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करतात. शरीरात असणारा थकवा-शीण त्याच बरोबर अशक्तपणा दूर करण्यासाठी फळे खाणे हा एक योग्य पर्याय आहे.

तुम्हाला अनेक फळे माहित आहेत जसे आंबा, सफरचंद, संत्रे व केळी इत्यादी. या प्रत्येक फळात वेग वेगळे गुणधर्म असतात. मात्र एक फळ आहे ज्यामध्ये या फळातील प्रत्येक गुण आहे ते म्हणजे केळे. केळे ही चवीला गोड असते आणि शरीराला सर्व गुणांनी उपयुक्त असते. आज आपण या लेखाद्वारे रोज केळ्यांचे सेवन केल्यास शरीरात काय बदल होतात या बद्दल थोडी माहिती घेवूया.

मित्रांनो भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.रोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील नव्वद मिनिटांपर्यंत उर्जा मिळते.

हे वाचा:   भयंकर मोठा खुलासा.! रात्रीच्या वेळी पुरुषांनी मुळा खाल्ला तर नेमके काय होत असते.? पुरुषांनी मुळ्याची भाजी खावी की नाही.!

मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेक दरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. डोक्यावर मोठ्या प्रमाणात तणाव तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. याने तुमचे डोके शांत होईल व एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रस्तापित होवू लागेल. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे.

केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. सोबतच शरीरात असणारी कमजोरी व अशक्तपणा देखील गायब होतो. मित्रांनो परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा. याने तुमची स्मरणशक्ती तल्लग होते व तुम्ही कोणत्या ही तणावा शिवाय निर्धास्तपणे परीक्षा पार कराल.

केळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. होय केळी खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात. त्याच बरोबर केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक ऍसीड
जीवनसत्व अ,ब व क, आर्यन, कॅल्शियम असते. शरीराला याचा चांगलाच फायदा होतो.

आपली रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढू लागते. जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम. केळे खाल्याने पोटाच्या संबंधीत असणार्या सर्व बाधा कमी होतात. जेवणानंतर केळे खाल्यास तुम्ही सेवन केलेले सर्व अन्न योग्य वेळी पचन होते. केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.

हे वाचा:   या वेलीच्या चार काड्या तुमचे अवघे जीवन बदलू शकते.! चार पाने तोडून त्याचा करायचा असा उपाय.! सगळे आरोग्य बदलून जाईल.!

रोज केळे खाल्यास आपल्या र’क्तात असणारे वाईट कोलेस्टेरॉल कमी होवून त्याचे रुपांतर चांगल्या कोलेस्टेरॉल मध्ये होते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते. वारंवार तोंड आल्यास केळ्याचे सेवन नक्की करा. त्यामुळे तोंडातील वाईट कीटाणू मारतात आणि तुम्ही विकार मुक्त होता. अधिक म’द्यपान केल्याने हँग ओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.

केळे एक पूर्ण ब्रह्म आहे. आपल्या भारत देशात केळ्याचे धार्मिक महत्व देखील आहे. रोज जेवल्यानंतर केळे खाणे आपल्याला एक उत्तम व रोग मुक्त जीवनाकडे घेवून जाण्याचा मार्ग आहे. मात्र कोणती ही गोष्ट अती केल्यास त्याच विपरीत परिणाम देखील होतो. जास्त प्रमाणात केळी खाल्यास तुम्हाला सर्दी व उलट्या होण्याची दाट शक्यता असते म्हणून रोज फक्त दोन केळ्यांचे सेवन करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.