असे वरण खूप चवदार बनते.? वरणात ही वस्तू खूपच थोडी टाकावी.! खतरनाक वरण बनेल.!

आरोग्य

वरण भात हा अनेक लोकांचा आवडीचा विषय असतो अनेक लोक वरण भातावर आवडीने ताव मारत असतात. वरण भात खाणे ही प्रत्येकाची इच्छा असते.! म्हणजे आपल्या जेवणाच्या ताटामध्ये वरण-भात नसेल तर जेवण हे अपूर्ण वाटत असते.! अशावेळी वरण हे सुंदर चवीला छान असणे खूप गरजेचे असते.! वरण बनवण्याची पण एक वेगळी पद्धत असते.! अनेक सुगरण महिलांना याबाबत छानशी माहिती असेलच.!

परंतु आज आम्ही तुम्हाला वरण बनवण्याची एक वेगळी सोपी पद्धत सांगणार आहोत. कष्ट-परिश्रम केले जातात दोन वेळच्या जेवणासाठी. चांगला आहार आपल्या शरीराला शक्ती प्रदान करतो आणि याच्या सेवनाने तुमचे आरोग्य देखील चांगले राहते. आपण भारतीय सुरवाती पासूनच खाण्याचे शौकिन आहोत. आज-काल अनेक लोक खाद्य पदार्थांचा व्यापार करुन दिवसाला लाखो-करोडो रुपये कमवतात.

भाजी-भाकरी व भात आणि वरण हे आपल्या भारतीय ताटातला मुख्य घटक आहेत. हा आहार पचण्यास हलका व शरीरासाठी सर्व घटक प्राप्त करुन देणारा आहे. मात्र वरण म्हटले की आपण प्रत्येक जण रोज पेक्षा थोडा जास्त भात खातो. वरण हे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच पसंतीचे व्यंजन आहे. घरी वरण बनवलेले असले की सर्वच आवडीने जेवण करतात.

भारतात असे कमीच लोक आहेत ज्यांना वरण आवडत नाही. भारताबाहेर देखील या वरणाचे अनेक चाहते आहेत. आपल्या भारतीय महिलांना वरण बनवण्यात महारथ असते. परंतू तुम्ही कधी वरण बनवले आहे का.? तुम्हाला हे तयार करण्याची कृती व लागणारी सामग्री माहित आहे का.? सामन्य वरण तर कोणी ही तयार करु शकते. परंतू आज आम्ही आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही तर वेगळे आणि खास वरण कसे तयार केले जाते याची कृती सांगणार आहोत.

हे वाचा:   दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचले जातील.! यापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे.! याचे असे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

मित्रांनो वरण तयार करण्यासाठी सर्व प्रथम दोन वेग-वेगळ्या प्रकारच्या डाळी घ्या. तुम्ही या डाळी चांगल्या दर्ज्याच्या घ्या. आता तुरीची डाळ एक पेला व मूगाची डाळ घ्या. आता रात्री या डाळी रात्री एकत्र करुन पाण्यात भिजायला घालून ठेवा. सकाळी या डाळी एका कूकरमध्ये टाका व गॅस चालू करा. आता गॅस मंद आचेवर ठेवा आणि तीन ते चार शिट्या झाल्यावर गॅस बंद करा.

लगेच कूकर उघडू नये याने गरम पाणी अंगावर उडू शकते त्यामुळे याची काळजी घ्यावी. कूकरची सर्व हवा गेली की पाच मिनिटाने कूकर उघडा व यातील डाळ आता चांगली शिजली असेल. आता एका पतेल्यात आपल्याला लसणाची फोडणी मारुन घ्यायची आहे. फोडणी मारण्यासाठी सर्व प्रथम गॅसवर पातेले ठेवा व मंद आचेवर गॅस चालू करा. आता या भांड्यात थोडेसे तेल टाका. आता या तेला लसूण टाका. लसूण आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील लसूण फायदेशीर आहे. चार ते पाच पाकळ्या लसणीच्या सोलून यात टाका. यानंतर यात एक चिमुट भरुन मोहरी घाला आता तुमच्या तेलाला तडका येवू लागेल. या नंतर वरणाला थोडा तिखटपणा येण्यासाठी चार ते पाच मिरच्या टाका. या नंतर चवीसाठी दोन ते तीन पाने कडीपत्याची टाका. या नंतर या फोडणीत हळद टाका. हळद मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर असते. शरीरात ऊर्जा देण्याचे काम हळद करते.

हे वाचा:   मा-सिक पा-ळी दरम्यान कधीही करू नये या चुका...! आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल!

हळद चवीला देखील तिखट नसते त्यामूळे लहानमुले देखील वरण आवडीने खातात. हळद एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. लहानपणा पासूनच प्रथमोपचाराचा पहिला घटक म्हणजे हळद हेच आपल्याला शिकवले जाते. आता दोन ते तीन चमचे हळद या फोडणीत टाका. यात पुढे आपण उकडलेली डाळ टाका. या नंतर चवीसाठी वरुन मीठ टाका. आपल्या वरणाला चांगला सुगंध येण्यासाठी यात कोथिंबीर बारीक करुन टाका.

आपल्या वरणात पौष्टिक घटक व गुणवत्ता वाढवण्यासाठी यात एक टोमॅटो देखील बारीक कापून टाका. आता पंधरा मिनिटात तुमचे चवदार व पौष्टिक वरण तयार होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.