लिंबू पाणी खरच वजन कमी करते का.? पोटावर चरबी घेऊन मिरवणारे एकदा हे नक्की वाचा.!

आरोग्य

शरीर तंदूरस्त राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करत असतो, जेणेकरून आपले वजन कमी होईल अशी आशा ठेऊन आपणं ह्या सर्व गोष्टी करतो. तर ह्या सर्व गोष्टी न करता देखील तुमचे वजन कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की, त्या उपायांमुळे तुमचे वजन एक आठवडा देखील कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लिंबाची गरज लागणार आहे. लिंबाचा वापराने वजन कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते लिंबू हे एकंदरीत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पचनाच्या समस्याही दूर करतात. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकतो,ज्यामुळे वजन सहज कमी होते.

तसेच, लिंबू स्नायूंना टोन करण्यास आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतो. लिंबूमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी -6, पेक्टिन आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल असते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सीडंट्स, फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण न देता, हृदय निरोगी ठेवतात आणि इतर प्रकारच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करतात. लिंबाचे खूप फायदा आपल्याला होतात.

हे वाचा:   शरीरावर असलेली कुठलीही गाठ गायब झाल्याशिवाय राहणार नाही, हे फळ गाठ पुन्हा येऊ देणार नाही.!

आता आपण असे लिंबूपाणी तयार करणार आहोत की त्या लिंबू पाण्यामुळे तुमचे एका आठवड्यातच पाच किलो वजन कमी होऊ शकेल.हा उपाय करण्यासाठी आपण घेणार आहोत चार लिंबू. सर्वात पहिला त्या लिंबू ना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. त्या लिंबू चे मधोमध दोन भाग करून लिंबाचा रस आपल्याला एका ग्लासमध्ये काढायचा आहे. लिंबाचा रस काढलेला आहे ते आपल्याला या उपायांमध्ये वापरायचं नाही.

हा उपाय करण्यासाठी लिंबाच्या साली आहेत म्हणजेच ज्यामधून आपण लिंबाचा रस काढले आहे ते लिंबाचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहे. लिंबाचा रस पूर्णपणे काढूनच लिंबाचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहे. लिंबांच्या सालीमध्ये विटामिन सी आणि विटामिन बी चे प्रमाण जास्त असते तसेच फायबरचे देखील प्रमाण असते त्यामुळे लिंबाच्या सालीचा देखील वापर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो.

त्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवून त्यावर एक टोप ठेवायचे आहे, त्या टोपा मध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालायचे आहे. पाणी घातल्यानंतर ते पाणी थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे लिंबाचे तुकडे आहेत ते त्या पाण्यामध्ये घालायचे आहे. लिंबाचे तुकडे घातल्यानंतर त्या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत तर ते पाणी उकळवायचे आहे. जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा त्या पाण्यामध्ये एक चमचाभर काळे मीठ घालायचे आहे आणि पाणी चमच्याने थोडे ढवळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   कितीही सफेद असू द्या तुमचे केस, कायमचे काळे कुळकुळीत करणे नाही इतके अवघड.! त्यासाठी करावे लागेल हे एक काम.!

मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटाने गॅस बंद करायचे आहे. गॅस बंद करुन झाल्यावर ते गरम पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे. अशाप्रकारे लिंबाचा रस तयार झालेला आहे. हे लिंबाचे रस थोडे गरम असतानाच प्यायचे आहे. हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला देखील फरक जाणून येईल. उपाय आवडल्यास हा उपाय इतरांना शेअर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.